Central Government warns states to be vigilant against the increasing number of Covid patients
कोविड रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी सावधगिरी बाळगावी असा केंद्र सरकारचा इशारा
नवी दिल्ली : गेल्या काही आठवड्यांमध्ये कोविड-19 रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे, अशा राज्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आणि सतर्क राहण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत.
आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल रुग्णसंख्या वाढ नोंदवणाऱ्या तसंच सरासरीपेक्षा कमी लसीकरण झालेल्या अशा 14 राज्यांच्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला.
या चौदा राज्यांमध्ये दर आठवड्याला कोविड रुग्णांची वाढती संख्या, चाचण्यांचं कमी प्रमाण आणि सरासरीपेक्षा कमी असणारा लसीकरणाचा दर या समस्या आढळून आल्या आहेत.
आरोग्य मंत्रालयानं नऊ जून रोजी दिलेल्या कोविड सुधारित पाहणी धोरणाच्या निर्देशांचं राज्यांनी पालन करावं आणि साठ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचं, तसंच १२ ते १७ वयोगटातील मुलाचं कोविड प्रतिबंधक लसीकरण अग्रक्रमानं करण्यात यावं, अशा सूचना त्यांनी या बैठकी दरम्यान राज्यांना दिल्या.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com