शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची घरं आणि कार्यालयांबाहेर केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचा बंदोबस्त तैनात

Hadapsar News Vidhan Bhavan, Mumbai Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

Central Reserve Security Force deployed outside Shiv Sena rebel MLAs’ homes and offices

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची घरं आणि कार्यालयांबाहेर केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचा बंदोबस्त तैनात

मुंबई : राज्यातल्या १५ बंडखोर आमदारांच्या घरी आणि कार्यालयाबाहेर केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचा बंदोबस्त तैनात केला आहे. या आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.Hadapsar News Vidhan Bhavan, Mumbai Hadapsar News

दरम्यान, सर्व बंडखोर आमदारांना पुरेशी सुरक्षा पुरवण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांना दिले आहेत.
कुटुंबियांची सुरक्षा अवैधरित्या काढून घेतल्याची तक्रार शिवसेनेच्या ३८, प्रहार जनशक्ती पक्षाच्या २ आणि ७ अपक्ष आमदारांनी राज्यपालांकडे केली आहे.

काहींची घरं आणि कार्यालयावर हल्ले झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर तत्काळ सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिल्याचं राज्यपालांच्या पत्रात नमूद केलं आहे.

बंडखोरांच्या गटाचा अजूनही भाजपाशी संपर्क नाही- रावसाहेब दानवे

शिवसेनेतल्या बंडखोरांच्या गटानं अजूनही भाजपाशी संपर्क केलेला नाही. त्यांनी संपर्क केला तर राज्यातले नेते निर्णय घेतील, असं भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात बडोद्यात बैठक झाल्याचं वृत्त काही प्रसार माध्यमांनी दिलं होतं. मात्र अशाप्रकारची बैठक झालेली नसून फडणवीस मुंबईतच असल्याचं दानवे म्हणाले. तर अशा प्रकारची कुठली बैठक झाली याची माहिती नसल्याचं, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *