A lecture at the University on ‘Challenge of Environmental Destruction and Political Theory
‘पर्यावरण विनाशाचे आव्हान आणि राजकीय सिद्धांत’ या विषयावर विद्यापीठात व्याख्यानाचे आयोजन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज येथील प्रा.अनंत गिरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ.मंगेश कुलकर्णी यांनी याबाबतची माहिती दिली. ‘पर्यावरण विनाशाचे आव्हान आणि राजकीय सिद्धांत’ या विषयावर हे व्याख्यान मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता आंबेडकर भवन येथील राज्यशास्त्र विभागात वर्ग खोली क्रमांक एक मध्ये होणार आहे.
विभागाचे माजी प्रमुख प्रा.राम बापट यांच्या ९१ व्या जन्मदिनाच्या व १० व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखक प्रा.विनय हर्डीकर असणार आहेत. प्रा.बापट यांच्या आठवणी व त्यांच्या कार्याचा या निमित्ताने आढावा घेण्यात येणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com