पुढचे ३ दिवस महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

Chance of rain in sparse places in Maharashtra for next 3 days

पुढचे ३ दिवस महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात अवकाळी पावसाचं (unseasonal rains)वातावरण झालं आहे. सोमवारी संध्याकाळी राज्यातल्या तुरळक ठिकाणी गडगडाट झाल्याची माहिती मिळत आहे.Weather Forecast Image
आगामी २,३ दिवस दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातल्या अवकाळी सावटामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसंच कोकणातल्या आंब्यावरही परिणाम होण्याची भीती आहे.
मात्र त्याचवेळी विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. बुधवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे गडगडाट, जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर येत्या गुरुवारी याच परिसरात हलक्या सरी होण्याचीही शक्यता आहे.

हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.

Hadapsar News Bureau
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *