After the fare hike, the deadline for changing the rickshaw-taxi meters will end on Wednesday
भाडेवाढीनंतर रिक्षा-टॅक्सीच्या मीटरमध्ये बदल करण्याची मुदत बुधवारी संपणार
मुंबई : राज्याच्या परिवहन विभागानं रिक्षा, टॅक्सी आणि कुल कॅबचं भाडं वाढवल्यानंतर नोव्हेंबर अखेरपर्यंत मीटरमध्ये भाडे बदल करण्याचे निर्देश दिले होते. दिलेल्या मुदतीच्या आत वाहनांमध्ये मीटर भाडे बदल करण्याच्या सूचना रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिल्या होत्या.
मात्र फक्त ३४ टक्के वाहनांच्या मीटरमध्ये भाडे बदल झाले आहेत. येत्या चार दिवसांत ही मुदत संपणार आहे. त्यामुळे १ डिसेंबरपासून रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या मीटरमध्ये भाडे बदल बंधनकारक राहणार आहे.
मीटरमध्ये भाडे बदल नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं परिवहन विभागानं कळवलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com