Organized Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp at Kasba Peth
कसबा पेठ येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन
करिअर, शिक्षणाच्या विविध संधीबाबत मार्गदर्शनपर व्याख्याने, सचित्र प्रदर्शन, आय.टी.आय. कोर्सच्या पुढील शिक्षणासंदर्भातील माहिती
पुणे : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध यांच्यावतीने २ जून रोजी सकाळी १० वाजता रतनबेन चुनिलाल मेहता गुजराती हायस्कुल, १४३६ गणेश रोड, फडके हौद, कसबा पेठ, पुणे येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे संस्थेचे प्रभारी उपसंचालक आर.बी.भावसार यांनी कळविले आहे.
या शिबीरात इयत्ता १० वी व १२ वी नंतर करिअर, शिक्षणाच्या विविध संधीबाबत मार्गदर्शनपर व्याख्याने, सचित्र प्रदर्शन, आय.टी.आय. कोर्सच्या पुढील शिक्षणासंदर्भातील माहिती, १२ वी नंतरचे अभ्यासक्रम व प्रवेश प्रक्रियेची माहिती, शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती, परदेशातील शिक्षण व महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ यासंदर्भातील माहिती देण्यात येणार असून स्वयंरोजगाराबद्दल माहिती देणारे स्टॉल देखील लावण्यात येणार आहेत.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत नोंदणीसाठी क्यू. आर. कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. इयत्ता ९ वी ते १२ वी परीक्षा दिलेले विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी क्यू. आर. कोडच्या सहाय्याने नोंदणी करून शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com