छत्रपती शाहूमहाराज रयतेचे राजे होते

साधना विद्यालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

छत्रपती शाहूमहाराज रयतेचे राजे होते  : प्राचार्य दत्तात्रय जाधव

साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे छत्रपती शाहूमहाराज जयंती साजरी

हडपसर : राजे अनेक होऊन गेले. परंतु छत्रपती शिवाजीमहाराज यांचा आदर्श घेऊन रयतेच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे,रयतेच्या मनातील राजे खूप कमी होऊन गेले.आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करून शाहूमहाराज यांनी लोककल्याणकारी कारभार केला.राजर्षी शाहू महाराज Rajarshi Shahu Maharaj हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

राजर्षी छत्रपती शाहूमहाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्ड सचिव प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले. साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे छत्रपती शाहूमहाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले.चित्रा हेंद्रे यांनी शाहूमहाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. त्यानंतर गंधर्व वाव्हळ,वेदांत ढोले,शाहिद शेख,अमेय नरूटे,आर्यन जगताप,यश काळेल,संस्कार शेलार,या विद्यार्थ्यांनी शाहूमहाराज यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. सुवर्णा कांबळे यांनी शिक्षक मनोगतात शाहूमहाराज यांच्या समग्र जीवनाची माहिती सांगितली.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव , उपप्राचार्य डॉ. अमिरुद्दीन सिद्दीकी ,उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत,आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख संगिता रूपनवर व सविता पाषाणकर, सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना अवघडे यानी केले.सूत्रसंचालन स्मिता क्षीरसागर यांनी केले.तर आभार अनिल वाव्हळ यांनी मानले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *