Chief of The Air Staff Flies Indigenous Fighter Jet Aircraft At Bangalore
हवाई दल प्रमुखांनी बंगळुरू इथे भारतीय बनावटीच्या लढावू विमानातून केले उड्डाण
बंगळुरू: हवाई दल पर प्रमुख, एअरमार्शल वी.आर. चौधरी, दोन दिवसांच्या बंगळुरू दौऱ्यावर गेले आहेत. इथे त्यांनी भारतीय बनावटीच्या तीन लढावू विमानांतून स्वतः विमान चालवत उड्डाण केले.
यात, हलक्या वजनाचे काँबॅट लढावू विमान (LCA) तेजस, लाईट काँबॅट हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर (LCH), आणि हिंदुस्तान ट्रेनर-40 (HTT-40), ही देशी बनावटीची विमाने, आत्मनिर्भर भारत मोहिमेचा भाग म्हणून आता भारतीय हवाई दलात, समाविष्ट करण्यात आली आहेत.
यावेळी हवाई दल प्रमुखांना, एलसीच LCH आणि HTT-40 या विमानांच्या क्षमता तसेच, तेजसच्या अद्यायावततेविषयी माहिती देण्यात आली. यवेळी, त्यांनी, या क्षेत्रातील सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना जाणून घेण्यासाठी, विमानांचे रचनाकार, चाचणी करणाऱ्या चमूसोबतही चर्चा केली.
आज, म्हणजे 6 ऑगस्ट 2022 रोजी हवाई दल प्रमुखांनी, एअर चीफ मार्शल एल.एम.खत्री स्मृति व्याख्यानमालेत आपले विचार मांडले.
हवाई दलाचे अनेक कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचारी-अधिकारी, एचएएल चे कर्मचारी आणि विमान उद्योगातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सीएएस यांनी यावेळी “भारतीय हवाईदलाच्या क्षमता आणि दलाच्या विकासाच्या योजना’ यावर बोलतांना, हवाई दलाच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com