Appeal for uncontested Chinchwad and Kasba Peth assembly by-elections
चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं मनसेप्रमुख राज ठाकरे यांचं आवाहन
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या चिंचवड आणि कसबा पेठ या दोन मतदारसंघातली पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.
भाजपाच्या कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक तसेच पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यानंतर या जागा रिक्त झाल्या होत्या.
विधानसभेची कसबा आणि चिंचवड मतदारसंघांची पोटनिवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं जाहीर केला.
ही पोटनिवडणूक बिनविरोध करून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत जो उमेदपणा भाजपानं दाखवला, तो आता महाविकास आघाडीनं दाखवावा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com