Chinta Shewli wins India’s third gold medal in weightlifting at 2022 Commonwealth Games
अचिंत शेउलीने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारोत्तोलनामध्ये भारताला मिळवून दिले तिसरे सुवर्णपदक
नवी दिल्ली : भारोत्तोलक अचिंत शेउलीने रविवारी रात्री चालू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 73 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावले. अचिंताने स्पर्धेत एकूण 313 किलो (स्नॅच 143 किलो + क्लीन आणि जर्क 170 किलो) वजन उचलले. भारताला स्पर्धेत मिळालेले हे सहावे पदक असून तिसरे सुवर्णपदक आहे. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातील भारतीयांनी अचिंतचे त्याच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अचिंत शेऊलीचे अभिनंदन केले आहे. “अचिंत शेऊलीने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आणि तिरंगा उंचावून भारताचा अभिमान वाढवला आहे. पहिल्या प्रयत्नातील अपयशावर त्वरीत मात करुन अव्वल स्थान गाठले. इतिहास रचणारे तुम्ही चॅम्पियन खेळाडू आहात. आपले मनःपूर्वक अभिनंदन!” असे राष्ट्रपतींनी ट्वीट संदेशात म्हटले आहे.
सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचिंत शिऊलीचे अभिनंदन केले आहे. ट्विट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले , “प्रतिभावान अचिंता शेऊलीने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले याचा अतिशय आनंद झाला. तो त्याच्या शांत स्वभावासाठी आणि चिकाटीसाठी ओळखला जातो आणि या विशेष कामगिरीसाठी त्याने कठोर परीश्रम घेतले आहेत. त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.”
पंतप्रधानांनी व्हिडिओ क्लिपही सामायिक केली आहे. पंतप्रधान म्हणाले की, “आपल्या देशाच्या खेळाडूंचा समूह राष्ट्रकुल स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी, मी अचिंत शेउली याच्याशी संवाद साधला होता. त्याला त्याच्या आई आणि भावाकडून मिळालेल्या पाठिंब्यावर आम्ही चर्चा केली होती. मला आशा आहे की आता पदक जिंकल्यावर त्याला चित्रपट पाहण्यासाठी वेळ मिळेल.”
सुवर्णपदक जिंकल्याबद्दल क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी अचिंता शेऊलीचे अभिनंदन केले आहे. श्री ठाकूर यांनी ट्विट केले, “अचिंत शिउली, यांना, त्यांचा राष्ट्रीय क्रीडा नैपुण्यता प्रशिक्षण तळ, पटीयाला (NSNIS) येथे शांत स्वभावाचा (Mister Calm) म्हणून ओळखले जात असे, त्याने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये भारतासाठी तिसरे सुवर्णपदक जिंकले आहे. अचिंतने भारतासाठी ही गौरवास्पद कामगिरी केल्याबद्दल आणि पदक जिंकून खेळात विक्रम केल्याबद्दल अभिनंदन. 313 किलो वजन उचलणे अत्यंत कौतुकास्पद आहे!!
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com