Citizens of Baramati will stay with Sharad Pawar forever, believes Jayant Patil
बारामतीतले नागरिक कायम शरद पवार यांच्यासोबत राहतील, जयंत पाटील यांचा विश्वास
इस्लामपूर : भाजपानं प्रचाराचं कुठलंही तंत्र अवलंबलं तरी बारामतीतले नागरिक कायम शरद पवार यांच्यासोबत राहतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं बोलत होते.
आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीमधील चित्र बदलल्याचं आपल्याला दिसेल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल बारामतीत बोलताना व्यक्त केला होता.
बारामतीचा पुढचा खासदार सेना-भाजपचा असणार आहे. नकली शिवसेनेचा नाहीतर असली शिवसेनेचा असणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे म्हणाले होते. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
बारामतीमधील जनता कशी आहे सर्वांना माहित आहे. त्यामुळे बारामतीमध्ये कोणी आलं तरी खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळतंच. बारामतीमधील एकवेळ सुर्य पश्चिमेकडे उगवेल पण बारामतीकर पवारांना सोडणार नाहीत एवढं ते नात घट्ट असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
शिवसेनेच्या दोन गटांमधील वादाबाबत न्यायालयात दररोज सुनावणी झाली तर चित्र लवकर स्पष्ट होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com