Class V and VIII Scholarship Examination on 20th July
इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलै रोजी
मुंबई : राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २० जुलै रोजी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेतली जाणार आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा लांबली होती. या पार्श्वभूमीवर यंदा शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यातच व्हावी यासाठी परीक्षा परिषदेने आवश्यक उपाययोजना केल्या होत्या.
मात्र टीईटी परीक्षा घोटाळ्यात विनर कंपनीचे नाव आल्यामुळे शासनाने या कंपनीच्या सहकार्याने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला.
परंतु, विनर कंपनीने न्यायालयात याचिका दाखल केली असता, न्यायालयाने विनर कंपनीच्या बाजूने निकाल दिला. परिणामी आता विनरच्या सहकार्याने येत्या २० जुलैला शिष्यवृत्ती परीक्षा घ्यावी लागणार आहे.
हडपसर न्युज ब्युरो