नागरिकांच्या सहभागातून विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन

Pune Municipal Corporation Logo हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

Organizing cleanliness drives at various places with the participation of citizens

नागरिकांच्या सहभागातून विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन

पुणे शहरातील स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवी संस्था, नागरिकांचा सक्रिय सहभाग

१५ क्षेत्रिय कार्यालये मिळून एकूण ७७ ठिकाणी स्वच्छता मोहीम

२७८१९ किलो सुका कचरा , ३७२४ किलो ओला कचरा ,४००० किलो राडाराडा असा एकूण ३५५४३ किलो इतका कचरा संकलित

पुणे : नागरिकांच्या सहभागातून सार्वजनिक स्वच्छता करण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत दिनांक ०८ जानेवारी २०२३ रोजी शहरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विविध सार्वजनिक रस्ते, वस्ती परिसर, शहरातील ऐतिहासिक स्थळे व पर्यटनस्थळे अशा विविध ठिकाणी या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.Pune Municipal Corporation

महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या प्रांगणात आज सकाळी झाले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि अन्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, विविध स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना ढाकणे यांनी जी २० परिषदेला पुण्यात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना पुणे शहराचे अनोखे दर्शन घडवण्यासाठी आपण सारे कटिबध्द होण्याचे आवाहन केले. उपस्थितांना यावेळी स्वच्छतेची शपथही देण्यात आली. नंतर या उपक्रमात सहभागी लोकांनी शनिवारवाडा प्रांगण आणि आतील बाजूस देखील सफाई मोहीम राबवली.

यावेळी  श्रीमती आशा राऊत, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन, माननीय उपायुक्त श्री नितीन उदास श्री अविनाश सपकाळ श्री आशिष महादळकर , ब्रँड अँबेसिडर श्री सत्या नटराजन, श्रीमती रूपाली मगर व श्रीमती निर्मला थोरमोठे, डॉक्टर केतकी घाटगे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, स्वच्छ पुणे स्वच्छ भारत चे विंग कंमांडर पुनीत शर्मा,पुणे ploggers, NSS चे volanteers,चैतन्य हास्य क्लब,स्वच्छ संस्था,आदर पूनावाला,NYKS च्या श्रीमती आम्रपाली चव्हाण,मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पुणे,एस. एन. डी. टी कॉलेज ऑफ़ Education पुणे , हुजूरपागा कॉलेज पुणे, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ़ कॉमर्स पुणे, डेक्कन कॉलेज येरवडा पुणे,P. Jog कॉलेज पुणे, BMCC कॉलेज पुणे, H. V. देसाई कॉलेज पुणे,नेहरू युवा केंद्र संघटन पुणे युवा व खेल मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना, वर्शिप अर्थ फाऊंडेशन, एकता योग फाऊंडेशन, भूमी जनविकास संस्था, SP college इत्यादी शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी असे एकूण ३०००-३५०० सहभागी यावेळी उपस्थित होते.

तसेच स्थानिक मा.सभासद, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांनी देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग नोंदविला.

दिनांक ०८/०१/२०२३ रोजी १५ क्षेत्रिय कार्यालये मिळून एकूण ७७ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून २७८१९ किलो सुका कचरा , ३७२४ किलो ओला कचरा ,४००० किलो राडाराडा असा एकूण ३५५४३ किलो इतका कचरा संकलित करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेमध्ये एकूण ६९२१ सहभागींनी आपला सहभाग नोंदविला.ह्या स्वच्छता मोहिमेच्या अनुषंगाने G-२० साठीच्या शहर सौंदर्यकरण तयारी मध्ये हातभार लागणार आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *