Clear the pending issues in the education department immediately
शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला शिक्षण विभागाचा आढावा
पुणे : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बालेवाडी-म्हाळूंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचा आढावा घेतला. शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे त्यांनी निर्देश दिले.
या बैठकीत शाळांना देण्यात येणारे अनुदान, त्रुटी पात्र शाळा, शिक्षण हक्क कायद्यानुसार दिले जाणारे प्रवेश, २० व ४० टक्के अनुदान मंजुरीसाठी शाळेकडील प्राप्त प्रस्ताव, तुकडी वाढ, वेतनेत्तर अनुदान, खासगी शैक्षणिक संस्थेत घेण्यात येणारे शैक्षणिक शुल्क, त्रुटी समितीचा अहवाल, त्यानुसार निर्गमित करण्यात आले शासन निर्णय आदी विषयवार चर्चा करण्यात आली.
संचालक श्री. पाटील यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग तर संचालक श्री. गोसावी यांनी प्राथमिक शिक्षण विभागाची माहिती आढावा बैठकीत सादर केली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com