लालफीत, दफ्तरदिरंगाई सारख्या शब्दांना हद्दपार करण्याची मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांना सूचना

Chief Minister instructs officials to ban words like red tape, daftardirangai

लालफीत, दफ्तरदिरंगाई सारख्या शब्दांना हद्दपार करण्याची मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई : लालफीत, दफ्तरदिरंगाई या शब्दांना हद्दपार करत सर्वसामान्यांच्या सुखासाठी काम करतांना राज्याच्या प्रगतीची “गती” कायम ठेवा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नागरी सेवा

Chief Minister Uddhav Thackeray. Hadapsar Latest News, Hadapsar News हडपसर मराठी बातम्या
File Photo

दिना निमित्त वर्ष 2021-22 साठीचा राज्यस्तरीय राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातल्या 18  पुरस्कारांचं वितरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृहात प्रदान करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

कोविड काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून, कुटूंबापासून दूर राहून शासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम केल्यामुळे या संकटाचा आपण मुकाबला करू शकलो अशा गौरवपूर्ण शब्दात मुख्यमंत्र्यांनी याकाळात केलेल्या कामाचे कौतूक केले.

सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातले दु:खाचे अश्रू पुसले जाऊन जेव्हा त्याची जागा आनंदाचे अश्रू घेतात तेव्हा प्रशासन चांगलं काम करत आहे, असं माननारा मी आहे, असंही ते म्हणाले. प्रशासनानं, आणि अधिकाऱ्यांनी कोरोना कालावधीत केलेली मदत ,बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री आणि प्रदर्शन कार्यक्रम, घरकुल प्रकल्प कार्यक्रम यशस्वीपणे राबवणं, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे केलेली अंमलबजावणी यामुळे हा पुरस्कार देण्यात आला.

प्रशासन किती सुलभतेने काम करत आहे याचे उदाहरण देतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यात सुलभपणे केलेल्या कर्जमुक्तीचा उल्लेख केला. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी आपल्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न शासन करत असून यासाठी शेती आणि शेतकरी हिताच्या अनेक महत्वाकांक्षी योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री  म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्व पारितोषिक प्राप्त अधिकारी- कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत नागरी सेवा हक्क दिनाच्या शुभेच्छा दिल्या.आपली निष्ठा, कर्तव्यभावना राज्य आणि देशाच्या विकासासाठी, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी जपावी, महाराष्ट्र हे आपल्या सर्वांचे मोठे कुटूंब आहे त्याच्या सुखासाठी काम करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यानिमित्ताने केले.
हडपसर न्युज ब्युरो ( Hadapsar News Bureau)
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *