Deputy Chief Minister Ajit Pawar has reduced VAT, making CNG and PNG cheaper in the state today.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हॅट कमी केल्यामुळे राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त
मुंबई परिसरात सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी स्वस्त, पाईपद्वारे स्वयंपाक गॅस प्रति एससीएम ३.५० रुपये स्वस्त
नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी ६० रुपये प्रति किलो, पाईपद्वारे स्वयंपाकाचा पीएनजी आता ३६ रुपये प्रति एससीएम
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मूल्यवर्धित कराचा (‘व्हॅट’) दर आज 1 एप्रिल 2022 पासून 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसेच वाहनांसाठीचे सीएनजी इंधन स्वस्त झाले आहे.
महानगर गॅसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो 6 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर पीएनजी हा पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम (स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर) 3 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला आहे.
नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी 60 रुपये प्रति किलो तर पीएनजी 36 रुपये प्रति एससीएम असेल.
Hadapsar News Bureau