Coaching Classes in University for Combined Defense Services (CDS) Examination
संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) परीक्षेसाठी विद्यापीठात प्रशिक्षण वर्ग
प्रा.जयंत उमराणीकर यांची माहिती
आठ महिन्यांचा अभ्यासक्रम
येत्या एप्रिल महिन्यापासून हे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचे नियोजन
पुणे : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाच्या धर्तीवर यंदाच्या वर्षीपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) (The Combined Defence Services Examination CDS Exam)परीक्षेसाठी विद्यापीठात प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक व माजी पोलीस महासंचालक डॉ.जयंत उमराणीकर यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नागरी सेवा परीक्षांसाठी ( MPSC एमपीएससी , UPSC यूपीएससी) स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नागरी सेवा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यात येते. याच धर्तीवर या केंद्रात आता संयुक्त संरक्षण सेवा परिक्षेसाठीचे (The Combined Defence Services Examination ) प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे.
विद्यापीठाने काहीच महिन्यांपूर्वी विद्यापीठात ‘National Cadet Corps’ (एनसीसी) सुरू केले असून या विद्यार्थ्यांना सीडीएस प्रशिक्षणाचा फायदा होईल. येत्या एप्रिल महिन्यापासून हे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचे नियोजन आहे.
– डॉ.संजीव सोनवणे, प्र- कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांच्या मार्गर्शनाखाली तज्ज्ञांच्या मदतीने याचा आठ महिन्यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून त्यामध्ये प्रवेश परिक्षेसाठीचे प्रशिक्षण आणि स्टाफ सिलेक्शन बोर्ड स्क्रिनिंगसाठी शारीरिक व मानसिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी ५० विद्यार्थी क्षमता असून यासाठी माफक शुल्क आकारण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण वर्गात नियमित मार्गदर्शनपर वर्ग, अभ्यासिका, ऑबस्टाकल ट्रेंनिग, ग्रंथालय, मुलाखतीसाठी आवश्यक मार्गदर्शन आदींचा समावेश असेल. या प्रशिक्षण वर्गात प्रा.जयंत उमराणीकर यांच्यासह निवृत्त कॅप्टन प्रा.चंद्रशेखर चितळे, कर्नल (निवृत्त) एस. हसबनीस व लष्करी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
हे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याच्या प्रक्रियेत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार आणि कॅप्टन चंद्रशेखर चितळे यांचेही मोलाचे योगदान लाभले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com