Raids on properties of Congress leaders in connection with coal duty scam
कोळसा शुल्क घोटाळ्याप्रकरणी कांग्रेस नेत्यांच्या मालमत्तांवर छापे
रायपूर: ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयानं कथित कोळसा शुल्क घोटाळ्याप्रकरणी छत्तीसगडमध्ये काही कांग्रेस नेत्यांच्या मालमत्तांवर छापे टाकले आहे.
कोट्यवधी रुपयांच्या कोळसा घोटाळ्याप्रकरणी छत्तीसगडमधील अनेक काँग्रेस नेत्यांच्या घरांवर ईडीने छापे टाकले. छत्तीसगडमधील कथित कोळसा लेव्ही घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय, ईडीने दोन काँग्रेस आमदारांसह अनेक काँग्रेस नेत्यांच्या घरांची झडती घेतली आहे.
वृत्तानुसार ईडीच्या पथकाने आज सकाळी भिलाईचे आमदार देवेंद्र यादव, बिलाईगडचे आमदार चंद्रदेव प्रसाद राय, प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष, राज्य सरकारच्या मालकीच्या महामंडळांचे अध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आणि इतरांच्या परिसरासह विविध ठिकाणी झडती घेतली.
24 फेब्रुवारीपासून रायपूरमध्ये काँग्रेसची 85 वी बैठक सुरू होणार आहे अशा वेळी हे छापे पडले आहेत.
या धाडींच्या विरोधात ईडीच्या कार्यालयाबाहेर दुपारी आंदोलन करु अशी प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे. शुक्रवारपासून काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन छत्तीसगडमध्ये सुरू होणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com