Combined Security Services Exam (II), 2021 Result Declared
संयुक्त सुरक्षा सेवा परीक्षा (II),2021 चा निकाल जाहीर
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने आयोजित केलेली संयुक्त सुरक्षा सेवा परीक्षा (II), 2021 चा निकाल आणि संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतलेली मुलाखत यामध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि गुणवत्तेच्या निकषानुसार निवड झालेल्या 214 (*139 + ^75 ) उमेदवारांची अंतिम यादी पुढीलप्रमाणे असून ही निवड (i) *ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई, येथील पुरुषांसाठीचा 116 वा शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्स (एनटी) आणि (ii) ^ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई, येथे ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू होत असलेला 30 वा शॉर्ट सर्व्हिस कमिशन महिला (नॉन-टेक्निकल) कोर्स, या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी करण्यात आली आहे.
116 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्स (एनटी) (पुरुषांसाठी) च्या यादीमध्ये याच परीक्षेच्या निकालाच्या आधारावर यापूर्वी शिफारस केलेल्या उमेदवारांची नावे देखील समाविष्ट आहेत, ज्यांनी इंडियन मिलिटरी अकादमी (भारतीय सैन्य अकादमी), देहरादून, नौदल अकादमी, एझिमाला, केरळ आणि एअर फोर्स (वायु दल) अकादमी, हैदराबाद (प्री-फ्लाइंग) प्रशिक्षण अभ्यासक्रम, या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा दिली होती.
2.सरकारने सूचित केल्यानुसार रिक्त पदांची संख्या (I) 116 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन अभ्यासक्रमासाठी (पुरुष) 169 आणि (II) 30 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन महिला (बिगर-तांत्रिक) अभ्यासक्रमासाठी 16 आहे.
3.गुणवत्ता यादी तयार करताना उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणीचा निकाल विचारात घेण्यात आलेला नाही. सर्व उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती आहे. या उमेदवारांची जन्म तारीख आणि शैक्षणिक पात्रता याची पडताळणी लष्कराच्या मुख्यालयाकडून केली जाईल.
4. उमेदवार युपीएससीच्या http://www.upsc.gov.in या वेबसाईटवर निकालाबाबतची माहिती मिळवू शकतील. तथापि, उमेदवारांचे गुण अंतिम निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत आयोगाच्या वेबसाइटवर 30 दिवसांच्या काळासाठी उपलब्ध होतील.
5. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपल्या आवारातील परीक्षा हॉल इमारती जवळ एक सुविधा काउंटर उघडले आहे. उमेदवार आपल्या परीक्षेबाबत कुठलीही माहिती/स्पष्टीकरण कामकाजाच्या दिवसांमध्ये सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 या वेळात वैयक्तिकरित्या अथवा दूरध्वनी क्रमांक 011-23385271, 011-23381125 आणि 011-23098543 वर मिळवू शकतील.
निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करावे:
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com