Dispute free committees will be set up to resolve disputes within the society
सोसायटीमधले वाद सोसायटीमध्येच सोडवण्यासाठी तंटामुक्त समित्या स्थापन होणार
मुंबई : राज्यातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेच्या धर्तीवर तंटामुक्त गृहनिर्माण सोसायट्या निर्माण व्हायला हव्यात, यासाठी स्वतंत्र समित्या नियुक्त करण्यासह विविध उपाय योजना सुचवणारा प्रस्ताव राज्याच्या सहकार विभागानं तयार केला आहे.
छोट्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वाद निर्माण होत असतात, त्यातले अनेक वाद विकोपाला पोहोचून अगदी पोलीस किंवा न्यायालयात जाईपर्यंत प्रकरण पुढं जातं.
हे सर्व टाळून सोसायटीमधले वाद सोसायटीमध्येच सोडवण्यासाठी तंटामुक्त समित्या स्थापन होणार आहेत.
हडपसर न्युज ब्युरो