राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत भारतासाठी पहिलं सुवर्णपदक मीराबाई चानूकडून

Birmingham Commonwealth Games बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar Newsराष्ट्रकुल स्पर्धा 2022 Commonwealth Games 2022

Commonwealth Games Updates : First Common Wealth Games gold medal for India from Mirabai Chanu, Bindiarani and Sanket Sargar silver medalists

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अपडेट्स : राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत भारतासाठी पहिलं सुवर्णपदक मीराबाई चानूकडून

बिंदियारानी आणि संकेत सरगर रौप्य पदकाचे मानकरी

भारताने पाकचा 8 विकेट्सने पराभव केला

बर्मिंगहॅम: इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारताला चार पदकं मिळाली. टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक मिळवणाऱ्या मीराबाई चानू हिनं भारोत्तोलनात ४९ किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलं आहे. तर बिंदीया राणी हिनं ५५ किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक जिंकलं आहे. तर पुरुषांच्या ६१ किलो वजनी गटात गुरुराज पुजारी यानं कांस्य पदक पटकावलं. Birmingham Commonwealth Games बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

ओंग वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा याने कॉमनवेल्थ गेम्समध्ये विक्रमी एकूण ३०० किलो वजन उचलून भारताचे दुसरे सुवर्णपदक जिंकले.

सांगलीच्या संकेत महादेव सरगरनं, इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत,आज भारोत्तोलनात रौप्य पदक पटकावून भारताला पदकांचं खातं उघडून दिल्यानंतर, सांगलीमध्ये आज जल्लोष करण्यात आला. भारोत्तोलनात गुरुराज पुजारीनं ६१ किलो वजनी गटात कांस्य पदक प्राप्त केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी संकेतचं अभिनंदन केलं.

दोन महिन्यांपूर्वी हरयाणात पंचकुला इथं झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धेत, संकेतची लहान बहीण काजल सरगरनं भारोत्तोलनातच महाराष्ट्राला पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं होतं. संकेतचे आई-वडील आणि बहीण तसच प्रशिक्षक यांनी संकेतच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पद असून पदतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. तर १३ सुवर्ण पदक मिळवत ऑस्ट्रेलिया प्रथम क्रमांकावर आहे.

दरम्यान, पदकं मिळवणाऱ्या खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी अभिनंदन केलं

भारतीय महिला हॉकी संघानं काल घानावर ५-० असा दणदणीत विजय मिळवला. यापुढचे सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडबरोबर होणार आहेत.

लॉन बॉलमधे पुरुषांच्या संघानं दुसऱ्या फेरीत फॉकलंड आयलंड्सचा ३६ विरुद्ध ४ असा पराभव केला. तर महिलांच्या संघानं कुक आयलंड्सवर १५-९ असा विजय मिळवला.

टेबल टेनिसमधे सत्यन ज्ञानशेखरनने सिंगापूरच्या झे-यू-क्लेरन्स-च्यूवर विजय मिळवला स्क्वाशमधे भारताची वयानं सर्वात लहान खेळाडू अनाहत सिंग हिनं विजयी सलामी दिली. सेंट विन्सेंटच्या जॅडा रॉसवर तिने विजय मिळवला.

भारताने पाकचा 8 विकेट्सने पराभव केला, भारतीय महिला क्रिकेट संघाने 18 षटकांच्या सामन्यात 38 चेंडू बाकी असताना केवळ 11.4 षटकांत 100 धावांचं लक्ष्य पार करत त्यांच्या पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्याचा आठ विकेट्स राखून आरामात पराभव केला.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *