भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला पाठिंबा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena Chief Uddhav Thackeray हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Communist Party of India supports Uddhav Thackeray’s candidate for Andheri East Assembly Constituency by-election

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला पाठिंबा

मुंबईच्या डबेवाल्यांचा उद्धव ठाकरे यांना पाठींबा

मुंबई : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळानं आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena Chief Uddhav Thackeray हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

भाजपाविरुद्धच्या लढ्यात आपला पक्ष महाविकास आघाडीसोबत राहिल,असं त्यांनी सांगितलं. सीपीआयचे ज्येष्ठ नेते प्रकाश रेड्डी, प्रकाश नार्वेकर, बाबा सावंत, मिलिंद रानडे, कामगारनेते विजय दळवी, बाबली रावत, यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी , आणि नफरत छोडो संविधान बचाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक फिरोज मिठीबोरवाला, यांनीही आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

आपली लोकशाही, आपला देश वाचवण्याचा आमचा एकत्रित प्रयत्न म्हणून नफरत छोडो संविधान बचाव अभियानात शिवसेनेला सहभागी करून घेण्याचं आवाहन आम्ही केलं, अशी माहिती तुषार गांधी यांनी दिली.

मुंबईच्या डबेवाल्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठींबा दर्शवला आहे. मुंबईच्या डबेवाल्यांनी हाती मशाल घेत आज वांद्रे इथल्या मातोश्री निवासस्थानी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर उपस्थित होते.

दरम्यान, काँग्रेस आणि शिवसेनेला युतीचा पर्याय दिलेला आहे, पण अजून उत्तर आलेलं नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. ते आज अमरावती इथं बातमीदारांशी बोलत होते. राज्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, पण देवेंद्र फडनवीस यांच्या डोक्यात अद्यापही मुख्यमंत्रीपद आहे, नुकसान भरपाई देऊ, असं ते म्हणाले पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही कारण त्यांच्याकडे निधीच उपलब्ध नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *