आरोग्य विषयक गंभीर समस्यांबाबत संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य प्रमुखांकडून चिंता व्यक्त

UN health chief expresses concern over serious health problems caused by the Ukraine-Russia war

युक्रेन रशिया युद्धामुळे निर्माण झालेल्या आरोग्य विषयक गंभीर समस्यांबाबत संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य प्रमुखांकडून चिंता व्यक्त

युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या आरोग्य विषयक गंभीर समस्यांबाबत संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य प्रमुखांनी चिंता व्यक्त केली असून जगाला सध्या ‘शांतता’ याच एका जीवरक्षक उपायाची गरज असल्याचंWHO has warned that the Omicron variant could lead to overwhelmed म्हटलं आहे.

युक्रेनमधली ४३ रुग्णालयं आणि आरोग्य केंद्रांवर झालेल्या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू तर ३४ जण जखमी झाल्याची पडताळणी WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं केल्याचं WHO चे महानिदेशक टेड्रोस घेब्रेसस यांनी काल संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सांगितलं.

युद्धामुळे देश सोडून जात असलेल्या विस्थापितांच्या लोंढ्यामुळे कोवीड-१९, न्यूमोनिया, गोवर आणि अन्य साथीच्या रोगांचा प्रसार होण्याची जोखीम वाढल्याचं त्यांनी सांगितलं.

WHO नं युक्रेनमध्ये आतापर्यंत १०० मेट्रिक टन औषधं आणि अन्य साधन सामुग्री पाठवली असून आणखी १०८ टन मदत सामुग्री पाठवण्याची तयारी सुरु असल्याचं टेड्रोस यांनी सांगितलं

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *