Concreting of roads in Pune district will be completed
पुणे जिल्ह्यातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करणार
– सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई : पुणे जिल्ह्यातील हवेली व वेल्हे तालुक्यातील पुणे-खडकवासला, डोणजे- रोजणे रस्ता आणि डोणजे- कोंढणपूर खेड शिवापूर रस्त्यांची अपूर्ण कामे काँक्रिटीकरण करून लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ला आणि पानशेतकडे जाणाऱ्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जांच्या कामाबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानसभा सदस्य सर्वश्री भीमराव तापकीर, प्रकाश आबिटकर, योगेश सागर, सुभाष धोटे, हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत मांडला होता.
श्री. चव्हाण म्हणाले की, पुण्यातील रस्त्यांची कामे अधिक दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. रस्त्याचे काम सुरू असताना वेळोवेळी ऑडिटसुद्धा करण्यात येईल. या कामाला अधिक गती देण्यासाठी आणि अडचणी समजून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची लवकरच एकत्र बैठक घेऊन आवश्यक त्या सुधारणा करून कालमर्यादित काम पूर्ण करण्यात येईल.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com