कुस्ती महासंघाशी संबंधित वादाची निष्‍पक्ष चौकशी करणार

Union MinisShri Anurag Singh Thakur

Anurag Thakur will conduct an impartial inquiry into the controversy related to the wrestling federation

कुस्ती महासंघाशी संबंधित वादाची निष्‍पक्ष चौकशी करणार – अनुराग ठाकूर

बृजभूषण यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी समिती स्थापन, कुस्तीपटूंचं आंदोलन मागे

Union MinisShri Anurag Singh Thakur
File Photo

नवी दिल्ली : कुस्ती महासंघाशी संबंधित वादाची निष्‍पक्ष चौकशी करण्याचं आश्वासन केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना दिलं आहे. या आश्वासनानंतर कुस्तीपटूंनी नवी दिल्ली इथं सुरु असलेलं आपलं आंदोलन मागे घ्यायचा निर्णय घेतला.

खेळाडूंचं लैंगिक शोषण, महासंघात आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजातली अनियमितता या आरोपांच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केल्याचं त्यांनी सांगितलं. ही समितीनं चार आठवड्यात आपला चौकशी अहवाल सादर करणार असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली आहे.

बृजभूषण यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी समिती स्थापन, कुस्तीपटूंचं आंदोलन मागे

कुस्ती महासंघ आणि कुस्तीपटू यांच्यातील वादात लक्ष घालत भारतीय ऑलिंपिक संघटनेनं मोठा निर्णय घेतला असून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांच्या चौकशीसाठी सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये खेळाडू मेरी कोम, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, योगेश्वर दत्त, सहदेव यादव यांच्यासह आणखी दोन वकिलांचा समावेश आहे.

या समितीनं एक महिन्यात आपला चौकशी अहवाल सादर करायचा असून समितीकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत बृजभूषण शरण सिंह यांना पदावर काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी भारतीय कुस्तीपटूंनी या अन्यायाविरोधात आंदोलन सुरू केलं होतं. काल केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर खेळाडूंनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *