Conference on Bridging School and University Education
शाळा आणि विद्यापीठ शिक्षणाचा सेतू विषयावर परिषद
सावित्रीबाई फुले विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० विषयक दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० – प्रभावी अंमलबजावणी आणि पुढच्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक तयार करणे ‘ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठातील शिक्षणशास्त्र प्रशाळा आणि शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग यांनी कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन फाऊंडेशन आणि मॅप इपिक कम्युनिकशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित केली आहे. दिनांक २४ व २५ फेब्रुवारी दरम्यान ही परिषद विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे.
या परिषदेत प्राथमिक शिक्षण आणि विद्यापीठीय शिक्षण यांच्यातील सेतू बांधणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणींवर उपाय सुचविणे, शिकवण्याच्या नवीन पद्धतींचा अभ्यास करणे आदी बाबी या परिषदेत चर्चिल्या जाणार आहेत.
या परिषदेला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्यासह शिक्षण विषयातील तज्ज्ञ मंडळी सहभागी होणार आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com