Congress leader Rahul Gandhi criticized that an atmosphere of violence, fear and hatred has been created in the country in the last eight years
गेल्या आठ वर्षात देशामध्ये हिंसा, भीती, द्वेषाचं वातावरण निर्माण झालं असल्याची काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका
वाडेगाव : गेल्या आठ वर्षात देशामध्ये हिंसा, भीती, द्वेषाचं वातावरण निर्माण झालं आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. ते आज भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं अकोला जिल्ह्यात दाखल झाल्यावर, वाडेगाव इथं आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते.
सत्ताधारी भाजपाचे नेते शेतकऱ्यांशी, युवकांशी बोलायला तयार नाहीत, ते बोलले तर त्यांना कळेल की देशात किती मोठी बेरोजगारी पसरली आहे, मात्र ते तसे करत नाहीत, म्हणूनच आज देशामध्ये भारत जोडो यात्रेची गरज असून, ही यात्रा लोकांच्या मनात असल्यामुळेच आज लाखो लोक घराबाहेर पडत आहेत, असं ते म्हणाले.
भाजपानं प्रसार माध्यमांवर, न्याय मंडळावर दबाव टाकलेला आहे. आपल्याला असा भारत हवा आहे, की सर्वांना घेऊन चालणारा भारत, हे आता प्रत्येकानं ठरवणं गरजेचं आहे. भारत जोडो यात्रा देशाला जोडण्याचं काम करत आहे. असं असताना जर ही यात्रा थांबवण्याचा विचार असेल तर केंद्र सरकारनं ते करून पहावं, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.
या यात्रेत चालताना महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेले प्रेम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण कधीही विसरू शकत नाही, असं ते म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com