हवाई क्षेत्रातही इथेनॉल मिश्रीत इंधनाचा वापर करण्याचा सरकारचा गांभीर्यानं विचार

The government is seriously considering using ethanol-blended fuel in the air sector too: Nitin Gadkari

हवाई क्षेत्रातही इथेनॉल मिश्रीत इंधनाचा वापर करण्याचा सरकार गांभीर्यानं विचार करत आहे- नितीन गडकरी

मुंबई: रस्ते वाहतूकीप्रमाणे हवाई वाहतूकीतही इथेनॉल मिश्रीत इंधनाचा वापर करण्याचा विचार सरकार करत आहे, असं केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत भारतीय साखर आणिHadapsar News Nitin Gadkari इथेनॉल परिषदेत ते बोलत होते.
दोन वर्षापूर्वी गणतंत्र दिवसाच्या संचलनात १०० टक्के बायो इथेनॉल वापरुन जेटं विमानांनी उड्डाण केले होते. त्याच पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक आणि हवाई दलांच्या विमानांमध्ये इथेनॉलचा वापर वाढवण्यावर सरकार विचार करत आहे.

साखरेच्या उत्पादानापेक्षा इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देणं भविष्यात लाभदायक ठरणार असून भारताला ऊर्जा निर्यातक देश, तर शेतकऱ्यांना ऊर्जादाता बनवायची सरकारची इच्छा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
भारतात सध्या साखरेचा अतिरिक्त साठा पडून आहे. त्यात यावर्षी उसउत्पादन वाढले आहे. त्यामुळे भविष्यात उस उत्पादकांनी साखरेऐवजी इथेनॉलकडे वळण्याशिवाय पर्याय नाही.
याशिवाय भारतात गहू, तांदूळ, मका इत्यादी पिकांचंही प्रचंड उत्पादन होत असून, या अतिरिक्त उत्पादनाचा वापर इथेनॉल निर्मितीत केला, तर अतिरिक्त साठ्याचा प्रश्न सुटून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळू शकेल, असंही ते म्हणाले.

भारतानं साखर निर्यात सबसिडी डिसेंबर २०२३पासून बंद करण्याच वचन दिलं आहे. यासाठी सरकारनं २४५ कोटी लिटर उस मळी खरेदी करण्याचं धोरण स्विकारलं आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ ५५ लिटर उसमळीचा पुरवठा उस कारखान्यांनी केला आहे, त्यामुळे साखर उत्पादनाऐवजी इथेनॉल निर्मितीवर शेतऱ्यांनी लक्ष द्यायला हवं, असंही गडकरी यांनी सांगितलं.

भारतानं ऊर्जा क्षेत्रात आयतक्षम होण्यापेक्षा निर्यातक्षम होण्यावर भर दिला पाहिजे, असं ते म्हणाले.

इथेनॉल, मिथिनॉल, बायो इथेनॉल, बायो सीएनजी, बायो डीझेल, बायो एलएनजी, हरित हायड्रोजन आणि विद्युत आपले भविष्य असून सरकार ह्यूंडाइ, सूझूकी, टोयाटो या चारचाकी वाहन निर्मात्यांसह बजाज, हिरो यारख्या दूचाकी वाहन निर्मात्यांनाही मिश्र इंधनावर आधारीत वाहनांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देत आहोत.

लवकरच चारचाकी वाहनं, दूचाकी वाहनं तसंच बस, रिक्षासुद्धा मिश्र इंधनचलित असतील यासाठी सरकार प्रयत्नशिल असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

प्रधानमंत्र्यांनी तीन इथेनॉल पंपाचं उद्घाटन केलं आहे. भविष्यातही सरकार नागरिकांसाठी आणखी बायो इंधन विक्री पंप उभारणार असून, उस कारखान्यांनी आपल्या कारखान्यांत तसंच परिसरात इथेनॉल पंप उभारावेत असं आवाहन त्यांनी उपस्थित इथेनॉल उत्पादकांना केलं. इथेनॉल आणि हरित इंधनाच्या वापरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ येइलच शिवाय पर्यावरणाचंही मोठ्या प्रमाणात रक्षण करता येइलं असंही गडकरी म्हणाले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *