नागपूरमधील डबल-डेकर उड्डाणपुलाच्या  बांधकामाचे अनुकरण संपूर्ण देशात

नागपूरमधील डबल-डेकर उड्डाणपुलाच्या बांधकामाचे अनुकरण संपूर्ण देशात - केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी Construction of double-decker flyover in Nagpur is replicated across the country - Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Construction of double-decker flyover in Nagpur is replicated across the country – Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari

नागपूरमधील डबल-डेकर उड्डाणपुलाच्या  बांधकामाचे अनुकरण संपूर्ण देशात – केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी

नागपूर शहरात असलेला डबल डेकर उड्डाणपूल पुण्यातही बांधला जाणार आहे

नागपूर : नागपूरमधील डबल-डेकर उड्डाणपुलाच्या  बांधकामाचे अनुकरण संपूर्ण देशात होत आहे.  एकाच पिलर वर उड्डाणपूल आणि मेट्रो असल्याने तसेच महा मेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी सोबत काम केल्याने खर्चात मोठ्या प्रमाणात कपात झाली असून कामही गुणवत्तापूर्ण झाले  आहे. नागपूर शहरात असलेला डबल डेकर उड्डाणपूल पुण्यातही बांधला जाणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केलं.नागपूरमधील डबल-डेकर उड्डाणपुलाच्या बांधकामाचे अनुकरण संपूर्ण देशात - केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी Construction of double-decker flyover in Nagpur is replicated across the country - Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

आशियातील सर्वात लांब आणि सर्वात जास्त मेट्रो स्थानके असलेल्या प्रकल्पामध्ये नागपूर मेट्रो रेल प्रकल्पा अंतर्गत वर्धा महामार्गवरील डबलडेकर उड्डाणपूल आणि छत्रपती चौक, जय प्रकाश नगर आणि उज्जवल नगर मेट्रो स्टेशनची नोंद आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदविल्या गेली असून केंद्रीय  रस्ते वाहतूक  महामार्ग   मंत्री  नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेद्वारे सदर पुरस्कार एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन(कन्व्हेंशन हॉल) येथे  आयोजित कार्यक्रमात  आज महा मेट्रोला प्रदान करण्यात आला. यावेळी  महामेट्रोचे  मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, एनएचएआयचे प्रादेशिक अधिकारी राजीव अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.

उड्डाणपूलाच्या बांधकामांमध्ये दोन पिलर मधील जागा ही मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर करून  120 मीटर  केल्याने  त्याच्या उभारणीत कमी खर्च आला आहे  कामठी रस्त्यावरील पुलाचे बांधकाम सुद्धा 88% झाले असून या कामामध्ये प्रीकास्ट  टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे . या उड्डाणपुलाचे उद्घाटन सुद्धा येत्या दोन महिन्यात करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

नागपुरातील डबल-डेकर उड्डाणपुलाचे एक्सपान्शन जॉइंट्स  मध्ये सुधारणा करण्यासाठीची सूचना त्यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी  केली.  केंद्रीय रस्ते निधीतून सोमलवाडा ते मनिष नगर येथे 34 कोटीचा भुयारी मार्ग आणि  माहेश्वरी भवन ते फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन हा  80 कोटीचा भुयारी मार्ग चे काम हे आपण महा मेट्रोला दिले आहे.  या सोबतच ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पाचे सुद्धा तसेच शहरातील इतर  आरयूबी आरओबीचे  काम मेट्रो करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

महामेट्रोचे  मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी या रेकॉर्ड सोबतच कामठी रस्त्यावरील पुढचा रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा विश्वास व्यक्त केला . या रस्त्यावर  5.8 किली लांबीचा उड्डाणपूल असणार असून यावर पाच स्टेशन राहतील.  या सर्व कामगिरीसाठी त्यांनी महा मेट्रो मधील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले .

सध्या मेट्रोची प्रवाशी संख्या 66 हजार प्रति दिवस असून ती 2 लाख प्रती दिवस देण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला . गडकरी यांनी सुद्धा  पारडी मेट्रो लाईन सुरु झाल्यावर मेट्रोची लास्ट मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधरुन ही प्रवासी संख्या नक्की एक लाखावर जाईल असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महामेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग)  अनिल कोकाटे  यांनी केलं या कार्यक्रमाला  महामेट्रो,  एनएचआयचे  अधिकारी, इंडीया आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डचे  प्रतिनिधी  उपस्थित होते.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “नागपूरमधील डबल-डेकर उड्डाणपुलाच्या  बांधकामाचे अनुकरण संपूर्ण देशात”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *