आत्मनिर्भर भारतासाठी उद्योजक होऊन योगदान द्या

Organized National SC - ST Hub Conference at World Trade Centre, Mumbai वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे नॅशनल एससी - एसटी हब संमेलनाचे आयोजन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Contribute to self-reliant India by being an entrepreneur – Union Minister Narayan Rane

आत्मनिर्भर भारतासाठी उद्योजक होऊन योगदान द्या

– केंद्रीय मंत्री नारायण राणे

वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे नॅशनल एससी – एसटी हब संमेलनाचे आयोजन

राष्ट्रीय एससी / एसटी केंद्र आणि केंद्र सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेऊन उद्योजक होण्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे एससी / एसटी समुदायातील सदस्यांना आवाहनOrganized National SC - ST Hub Conference at World Trade Centre, Mumbai
वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे नॅशनल एससी - एसटी हब संमेलनाचे आयोजन
हडपसर मराठी बातम्या 
Hadapsar Latest News
 Hadapsar News

मुंबई : राष्ट्रीय एससी-एसटी अर्थात राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती केंद्राची परिषद मुंबईत 23 जानेवारीला आयोजित करण्यात आली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील सदस्यांमध्ये उद्योजकतेची संस्कृती रुजवण्यासाठी, राष्ट्रीय एससी-एसटी केंद्राविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी या उद्देशाने केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे कफ परेड येथील जागतिक व्यापार केंद्र, इथे दिवसभराच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले.

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न सत्यात साकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय एससी-एसटी केंद्र आणि इतर अनेक योजना आखल्या आहेत. या सर्व योजना रोजगार निर्मिती , उद्योजकतेला प्रोत्साहन, सकल देशांतर्गत उत्पन्न जीडीपी मध्ये वाढ आणि निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आल्या आहेत, असे राणे यांनी सांगितले.

वर्ष 2014 मध्ये जगातील दहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताने आता जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा बहुमान मिळवला आहे. वर्ष 2030 पर्यंत देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार असून त्यासाठी उद्योग क्षेत्राचे सहकार्य अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.

उद्योग क्षेत्रातील विकासात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि या विकासात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचे योगदान आणखी वाढणे आवश्यक आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. “ भारताच्या जीडीपीमध्ये एमएसएमईचा वाटा 30 टक्के आणि निर्यातीत 50 टक्के आहे. हे प्रमाण आणखी वाढवण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे.” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जर एखाद्याला उद्योग सुरु करताना काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर आमचे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय त्यांचे निवारण करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. उद्योजक घडवणे, रोजगार निर्मिती आणि देशाचा जीडीपी वाढवण्यासाठी आमच्या मंत्रालयामार्फत सुरू असलेल्या कामात प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे.

देशातून बेरोजगारी आणि गरीबीचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी एमएसएमई मंत्रालय कार्य करत आहे आणि प्रत्येकाने या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय एससी-एसटी केंद्र आणि एमएसएमई मंत्रालयाच्या विविध योजनेअन्तर्गत कर्जसुविधा आणि इतर सवलतींचा लाभ घेऊन उद्योजक व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

एमएसएमई क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेतील एक अतिशय सक्रिय क्षेत्र म्हणून उदयास आले आहे, असे एमएसएमईचे सचिव बी.बी. स्वेन म्हणाले. महाराष्ट्र हे राज्य त्यादृष्टीने एक सर्वोत्तम व्यवस्था देऊ करत असून नोंदणीकृत एमएसएमई मधील 20% महाराष्ट्रातील आहेत, असे त्यांनी सांगितले. शाश्वत विकासाकरता या क्षेत्राला सातत्याने नवनवीन कल्पना अंगीकारून अधिक स्पर्धात्मक होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या क्षेत्राला चालना देण्यासाठी मंत्रालय नवीन रूपरेषा आणि अभिनव योजना विकसित करत आहे, “आम्ही भागधारकांच्या सल्लामसलतीवर खूप लक्ष ठेवतो, परिषदेमध्ये आज दिलेल्या सूचनांवर आम्ही गांभीर्याने काम करू”, असे सचिव म्हणाले.

समाजातील शेवटच्या घटकातील एससी-एसटी उद्योजकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी आजच्या सारख्या परिषदांचे आयोजन केले जाते असे त्यांनी सांगितले. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी सार्वजनिक अधिग्रहण धोरणाचा भाग म्हणून, अनुसूचित जाती-जमातीतील उद्योजकांच्या अखत्यारीतील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना 4% वार्षिक अधिग्रहणाचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *