Covid-19 is still a global public health emergency – WHO
कोविड-१९ ही अजूनही सार्वजनिक आरोग्याबाबतची जागतिक आणीबाणी – WHO
कोविड-१९ ही अजूनही सार्वजनिक आरोग्याबाबतची जागतिक आणीबाणी असल्याचा इशारा WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. कोविड-१९ अद्याप संपला नसल्याचं कोरोनाच्या नव्या लाटांमधून स्पष्ट होत असल्याचं WHO चे महा संचालक टेड्रोस घेब्रेसस यांनी म्हटलं आहे.
कोविड-१९ च्या नव्या रुग्णांची संख्या वाढतच असून त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य सेवकांवरचा ताण वाढत आहे तसंच वाढता मृत्यू दर ही चिंतेची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सर्व सरकारांनी सध्याच्या कोविड-१९ महामारीबाबत विज्ञानाच्या आधारावर तसंच कोव्हिडच्या नव्या प्रारूपांची शक्यता लक्षात घेऊन आपल्या कोविड प्रतिसाद योजनांचा नियमितपणे आढावा घ्यावा आणि त्यामध्ये बदल करावेत असं घेब्रेसस यांनी म्हटलं आहे.
ओमायक्रॉनचे BA.४ आणि BA.५ या उपप्रकारांमुळे जगभर कोरोनाच्या लाटा येत असल्याचं ते म्हणाले. कोविड-१९ बाबतच्या आपत्कालीन समितीची गेल्या शुक्रवारी बैठक झाली. त्यानंतर हा विषाणू अजूनही सार्वजनिक आरोग्याबाबतची जागतिक आणीबाणी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
राज्यात काल कोविड-१९ च्या २ हजार ४३५ नव्या रुग्णांची नोंद
राज्यात काल कोविड-१९ च्या २ हजार ४३५ नव्या रुग्णांची नोंद झाली. २ हजार ८८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर, १३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ८० लाख ७ हजार ६४८ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७८ लाख ४२ हजार ९० रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४७ हजार ९९१ रुग्ण दगावले. सध्या राज्यात १७ हजार ५६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ९३ शतांश टक्के तर, मृत्यूदर १ पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. पुण्यातल्या बी जे वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयाच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बी-ए फोर चे २, तर बी-फाईव्ह चे ४ नवे रुग्ण आढळले आहेत. त्याबरोबरच बीए टू पाँईंट सेव्हन फाईव्हचे ३ रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com