2 percent Covid testing at various airports in the country
देशातल्या विविध विमानतळांवर २ टक्के कोविड चाचणी
परदेशातून आलेले एकूण ५३ जण कोरोनाविषाणू संसर्ग बाधीत
नवी दिल्ली : देशातल्या विविध विमानतळांवर २ टक्के कोविड चाचणी करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत ५ हजार ६६६ प्रवाशांचे नमुने गोळा करण्यात आले होते. यामध्ये परदेशातून आलेले एकूण ५३ जण कोरोनाविषाणू संसर्ग बाधीत आढळले आहेत.
उड्डाण करणाऱ्या सुमारे १ हजार ७१६ प्रवाशांचं निरीक्षण करण्यात आलं. भारतात चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड इथून येणाऱ्या प्रवाशांना आजपासून कोरोना विषयक नकारात्मक अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे.
कोविड संकटाचा सामना करण्यासाठी देशभरातल्या विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसंच कोविडसंबंधीच्या उपाययोजना सुनिश्चित करण्यासाठी केंद्रशासनानं काल पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉक्टर पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक समीक्षा बैठक घेतली. या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिशा निर्देश दिले होते.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com