Cultural program at the university on the occasion of Rabindranath Tagore’s birthday
रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम
पुणे : गरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त उपासना संस्था आणि ललित कला केंद्र गुरूकुल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक, 08 मे 2022
रोजी ललित कला केद्र गुरूकूल येथे टागोर इन पुणे नावाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ मुख्य इमारतीच्या परिसरात संस्था फेरीने हाईल. यावेळी गुरू रवींद्रनाथ टागोर यांच्या पालखीची मिरवणुक काढली जाईल. यामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे सहभागी होणार आहेत.
संध्या फेरीनंतर ललित कला केंद्र गुरूकुलच्या अंगणमंचामध्ये गुरू रावींद्रनाथ टागोर यांना अभिवादन करून कुलगुरू आणि कार्यक्रमाचे अतिथी उपस्थितांना मार्गदर्शन करतील. त्यानंतर शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण होईल.
त्यानंतर पदव्युत्तर वर्षातील संगीत, नृत्य, नाटय विषयांमध्ये विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या ललित कला केंद्र गुरूकुलच्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाईल व सत्कार समारंभानंतर हे विद्यार्थी अपली कला सादर करतील. त्यानंतर उपासना संस्थेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाउन कार्यक्रमाचा समारोप हाईल.
सदर वैशिष्टयपूर्ण कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे
हडपसर न्यूज ब्युरो