Curfew imposed in Mumbai till July 10
सत्ता संघर्षामुळे मुंबईत १० जुलैपर्यंत जमावबंदी (Curfew)लागू
मुंबई: पोलीस आयुक्त आणि पोलीस सह आयुक्त यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने मुंबईतील सर्व अपर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उपआयुक्तांची बैठक झाली. अशा स्थितीत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेतला.
सद्यपरिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी, मुंबई पोलिसांनी मुंबईत येत्या १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या अंतर्गत पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा जमाव, कुठल्याही व्यक्तींच्या कुठल्याही प्रकारच्या मिरवणुका, ध्वनिक्षेपक आणि संगीत वादकांचा संच आणि कुठल्याही प्रकारच्या मिरवणूकीत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
विवाह आणि तत्संबंधित इतर सोहळे, अंत्ययात्रा, चित्रपट-नाट्यगृह, सहकारी संस्थांचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, उद्योग-व्यापार विषयक व्यवहार, सरकारी कार्यक्रम यांना यातून वगळलं आहे.
दरम्यान, शिवसेनेचे मुंबईत कुर्ल्यातले बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांच्या नावाचा फलक तोडल्या प्रकरणी, शिवसेनेचे शाखाप्रमुख दिलीप मोरे आणि १९ आंदोलकांना, पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ही माहिती दिली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com