गेल्या तीन आर्थिक वर्षांत देशात २ लाख १३ हजार सायबर आर्थिक गुन्ह्यांची नोंद

Cyber-Crime-Pixabay

In the last three financial years, 2 lakh 13 thousand cyber financial crimes were recorded in the country

गेल्या तीन आर्थिक वर्षांत देशात २ लाख १३ हजार सायबर आर्थिक गुन्ह्यांची नोंद

स्वतःचा बचाव करा

सायबर घोटाळ्यांची तक्रार कुठे करावी

Cyber-Crime-Pixabay
Cyber-Crime Image by Pixabay.com

नवी दिल्ली : मागील ३ आर्थिक वर्षांत देशात २ लाख १३ हजार सायबर आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज दिली.

आर्थिक वर्ष २०१९-२० ते आर्थिक वर्ष २०२१-२२ या काळात डेबिट- क्रेडिट कार्ड स्वॅपिंग,बनावट कार्ड तयार करणे आणि हॅकिंग अशा इंटरनेट बँकिंग बाबतच्या आर्थिक गुन्ह्याच्या माध्यमातून ७३१ कोटी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकार निदर्शनास आले आहेत, अशी माहिती अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.

हे आर्थिक फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं एटीएम, सिम कार्ड च्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक, तसंच मोबाईल बँकिंग च्या माध्यमातून बँकेच्या सर्व्हर वरील ग्राहकांची माहिती चोरीला जाण्याचे प्रकार टाळण्यासाठी काही सुरक्षा निर्देश आणि सूचना दिल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

स्वतःचा बचाव करा

समाज माध्यमांवर आपली छायाचित्रे आणि वैयक्तिक माहिती सामायिक करताना सतर्क राहणे गरजेचे आहे. समाज माध्यमांवर दिलेल्या माहितीच्या आधारे आर्थिक घोटाळे आणि फसवणूक होण्याची शक्यता असते.

बॉटनेट, व्हायरस किंवा इतर गैरहेतूने वापरले जाणारे सॉफ्टवेअर, स्पायवेयर, क्रिप्टोरँनसमवेयर आणि ट्रोजन ही माहिती चोरीची सायबर गुन्हेगारांची मुख्य हत्यारे आहेत.

वैयक्तिक माहिती आणि एकदाच वापरले जाणारे पासवर्ड- ओटीपी मागणारे सॉफ्टवेअर घेऊ नका. स्पॅम इमेल्स ओळखा. कुठल्याही ऑफर देणाऱ्या लिंक्स अग्रेषित करू नका. तुमचे उपकरण इतरांना हाताळण्याची परवानगी देऊ नका.

सायबर घोटाळ्यांची तक्रार कुठे करावी

सायबर गुन्ह्यांची तक्रार करा 1930 या क्रमांकावर किंवा https://cybercrime.gov.in/ या संकेतस्थळावर

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *