सीतरंग हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता

Weather Forecast Image

Cyclone Sitarang, which is churning in the Bay of Bengal, is likely to intensify

पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेलं सीतरंग हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेलं सीतरंग हे चक्रीवादळ अधिक तीव्र होणार आहे. ते आजच्या दिवसभरात किंवा उद्या सकाळपर्यंत खेवपाराजवळचा बारीसाल-चट्टोग्राम किनारा ओलांडेल असा अंदाज बांगलादेशाच्या हवामान विभागानं वर्तवला आहे. हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन बांग्लादेशातल्या सातखीरा, खुलना, बागेरहाट, नोआखाली आणि इतर अंतर्गत बंदरांच्या परिसरात धोक्याचा तिसऱ्या क्रमांकाचा इशारा देण्याची सूचना केली गेली आहे.Weather Forecast Image

या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडच्या क्षेत्रात ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगानं वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस होईल अशी शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.

पुढच्या १२ तासात या चक्रीवादळाचा वेग वाढून ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे असं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे

एनडीआरएफने आपली पथके राज्यांना उपलब्ध करून दिली आहेत आणि अतिरिक्त पथकेही सज्ज ठेवण्यात येत आहेत. जहाजे आणि विमानांसह लष्कर आणि नौदलाच्या बचाव आणि मदत पथकांना सज्ज ठेवण्यात आले आहे.

कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीने राज्ये आणि केंद्रीय एजन्सींच्या तयारी उपायांचा आढावा घेतला. राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकार आणि संबंधित केंद्रीय एजन्सींच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आणि सावधगिरीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत यावर त्यांनी भर दिला.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *