Cyclone Sitarang subsided
सितरंग चक्रीवादळाचा जोर ओसरला
नवी दिल्ली : सितरंग चक्रीवादळानं काल बांग्लादेशच्या किनारपट्टीला धडक दिली. त्यानंतर या चक्रीवादळाचा जोर कमी झाला असून त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झालं आहे.
त्यामुळे उत्तर-पूर्व बांगलादेश आणि आसपासच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा उत्तर-ईशान्येकडे सरकून त्याचा जोर कमी होईल अशी शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे.
यामुळे अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. समुद्र खवळलेला राहणार असल्यानं उत्तर बंगालचा उपसागर आणि बांगलादेश किनारपट्टीलगतच्या मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com