सितरंग चक्रीवादळ बांगलादेशकडे सरकले

Weather Forecast Image

Cyclone Sitrang heading towards Bangladesh; Likely to trigger rainfall in North-East, West Bengal & Odisha

सितरंग चक्रीवादळ बांगलादेशकडे सरकले; उत्तर-पूर्व, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पावसाची शक्यता आहे

देशाभरातून मोसमी पाऊस माघारी

बांग्लादेशच्या दिशेने झेपावणाऱ्या सितरंग चक्रीवादळामुळे ईशान्य, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ मंगळवारी पहाटे तीनकोना बेट आणि संद्वीप दरम्यान बांगलादेशच्या किनारपट्टीला ओलांडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचा प्रभाव ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जाणवेल. दोन्ही राज्यांमध्ये आजपासून मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल.Weather Forecast Image

ईशान्य भागातही दिवाळीदरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्रिपुरा आणि ईशान्येकडील इतर राज्य सरकारांनी जिल्हा आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना चक्रीवादळाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आगाऊ खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे. समुद्राची स्थिती खडतर असल्याने, मच्छिमारांना बुधवारपर्यंत ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बांगलादेश किनारपट्टीलगतच्या समुद्रात जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

नॅशनल क्रायसिस मॅनेजमेंट कमिटी (NCMC) ने शुक्रवारी केंद्र आणि राज्य एजन्सीच्या तयारीचा आढावा घेतला. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) ने राज्यांना त्यांची टीम उपलब्ध करून दिली आहे. जहाजे आणि विमानांसह लष्कर आणि नौदलाच्या बचाव आणि मदत पथकांनाही सज्ज ठेवण्यात आले आहे

देशाभरातून मोसमी पाऊस माघारी

नैऋत्य मौसमी पावसानं देशाच्या काही भागातून माघार घेतली आहे. हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी आज ट्विटरवर ही माहिती दिली. गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, मात्र उद्या राज्याच्या सर्व विभागांमधे हवामान कोरडं राहील, असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. बांगलादेशाच्या नैऋत्येला बरिसालपासून बाराशे किलोमीटर आणि सागर बेटापासून दक्षिणेकडे साडे सहाशे किलोमीटर समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. येत्या सहा तासात तो वायव्येकडे सरकण्याची शक्यता असून त्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *