माहितीचं आदानप्रदान विश्वासाहार्य आणि त्वरित होण्यासाठी डेटा व्यवस्थापन योग्य असण्याची आवश्यकता

G20 summit 2023 G20 परिषद २०२३ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Data management needs to be right for reliable and instant exchange of information -Amitabh Kant

माहितीचं आदानप्रदान विश्वासाहार्य आणि त्वरित होण्यासाठी डेटा व्यवस्थापन योग्य असण्याची आवश्यकता

-अमिताभ कांत

मुंबई : भारत सरकार देशात डेटा व्यवस्थापनाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करत आहे. G-२० देशांनी सद्यपरिस्थित विकासासाठी माहितीचं आदानप्रदान विश्वासाहार्य आणि त्वरित होण्यासाठी योग्य डेटा व्यवस्थापनाची आवश्यकता आहे, असं मत G -२० चे भारताचे शेरपा अमिताभ कांत यांनी व्यक्त केलं.G20 summit 2023 G20 परिषद २०२३ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

ते आज मुंबईत सुरु असलेल्या G-२० च्या विकास कृती गटाच्या पहिल्या बैठकीतल्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना संबोधित करत होते. जगभरातल्या नागरिकांना डेटा सहज उपलब्ध व्हायला हवा यावर कांत यांनी यावर भर दिला.

‘राष्ट्रीय डेटा विश्लेषण मंचाद्वारे’ शासन पातळीवर भारत अधिक कुशलपणे काम करत असून प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली G -२० चं अध्यक्षपद निर्णायक पध्दतीनं आणि सर्वसमावेशक पद्धतीनं निभावलं जाईल, असं कांत यावेळी म्हणाले.

श्री कांत म्हणाले, कमी विकसित आणि विकसनशील देश डेटा आणि सुशासनाचा वापर केल्याशिवाय तंत्रज्ञानाच्या दृष्ट्या नेतृत्व आणि प्रगती करू शकणार नाहीत. हा डेटा जगभरातील नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे ते म्हणाले. श्री कांत म्हणाले, भारत सरकारने चांगले डेटा गव्हर्नन्स आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि डेटा गव्हर्नन्स क्वालिटी इंडेक्स सारखे अनेक उपक्रम आणले आहेत. नॅशनल डेटा अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म, देशातील महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांचा कायापालट करण्यासाठी डेटाचा वापर यासारख्या भारताच्या पद्धती त्यांनी शेअर केल्या.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे या बैठकीला संबोधित केले आणि भारताच्या कामगिरीचे सादरीकरण केले.
ते म्हणाले की, भारत सरकार लवकरच स्टार्टअप्स, संशोधक आणि एआय इकोसिस्टमच्या विशाल समुदायासह राष्ट्रीय डेटा गव्हर्नन्स फ्रेमवर्क पॉलिसी अंतर्गत एकत्रित केलेल्या आणि सामंजस्याने निनावी डेटा संच एकत्र करण्यास सुरुवात करेल. श्री चंद्रशेखर म्हणाले की डिजिटल अर्थव्यवस्थेकडे विश्वास आणि संरक्षणाच्या एकत्रित प्रिझममधून पाहिले पाहिजे.

दरम्यान, बंगळुरू इथं G-२० च्या विविध प्रमुख मुद्द्यांवर आज बैठका होत असून यात जगभरातले १८० पेक्षा वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *