43 दशलक्ष घरांपर्यंत पोहोचत डीडी फ्रीडीशने केली नवीन वाहिन्यांच्या समावेशाची घोषणा

DD FreeDish with 43 Million Homes announces new channel line-up

43 दशलक्ष घरांपर्यंत पोहोचत डीडी फ्रीडीशने केली नवीन वाहिन्यांच्या समावेशाची घोषणा

नवी दिल्ली : दूरचित्रवाणी सेवा वितरण उद्योगात लक्षणीय  वाढ नोंदवत, 43 दशलक्षहून अधिक घरांपर्यंत पोहोचलेला दूरदर्शन फ्रीडिश हा  सर्वात मोठा डीटीएच  मंच बनला आहे.

सुधारित लिलाव प्रक्रियांमुळे अधिक गुणवत्ता आणि विविध प्रकारच्या वाहिन्यांचे प्रमाण वाढवत 2017 आणि 2022 दरम्यान  दूरदर्शनच्या विनामूल्य डीटीएच सेवेने 2017 मधील 22 दशलक्ष वरून 2022 मध्ये 43 दशलक्ष घरांपर्यंत पर्यंत विस्तारत सुमारे 100% ची चांगली वाढ नोंदवली.

डीडी फ्रीडिश सेवेने  मोठ्या संख्येच्या वाढीचा   मार्ग का आणि कशाप्रकारे सुरु ठेवला आहे याला  अलीकडेच  प्रकाशित  झालेल्या फिक्की-ईवाय अहवाल 2022 ने  पुष्टी दिली आहे की,  ”कमी खर्चिक दूरचित्रवाणी संच, आर्थिक  पैलू  आणि या मंचावर नवीन वाहिन्यांची भर पडल्यामुळे या विनामूल्य दूरचित्रवाणी सेवेने आपला आधार वाढवत  43 दशलक्ष सदस्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. डीडी फ्रीडिश सेट-टॉप बॉक्सच्या विक्रीत वर्षानुवर्षे वाढ होत असल्याचे नमूद करत या अहवालात फ्रीडिश वितरकांचाही  उल्लेख करण्यात आला आहे.

2004 ते 2017 या 13 वर्षांतील 22 दशलक्ष सदस्यांच्या तुलनेत, डीडी फ्रीडिशची गेल्या 5 वर्षांतील वाढ लक्षणीय  आहे.2017 ते 2022 या  केवळ 5 वर्षांमध्ये, फ्री डिशने  आणखी 21 दशलक्ष सदस्य जोडले असून आता ही सेवा  एकूण 43 दशलक्ष सदस्यांपर्यंत  पोहोचली आहे.

प्रसार भारतीची डीटीएच सेवा असलेली  डीडी  फ्री डिश ही एकमेव फ्री-टू-एअर (एफटीए ) डायरेक्ट-टू-होम (डीटीएच ) सेवा आहे जिथे प्रेक्षकांना  कोणतेही मासिक सदस्यत्व  शुल्क भरावे लागत नाही.डीडी फ्रीडिश सेट-टॉप बॉक्स खरेदीसाठी  केवळ एकदाच 2000 रुपयांची  छोटी गुंतवणूक आवश्यक आहे.  https://prasarbharati.gov.in/free-dish/

डीडी  फ्रीडिश सेवेच्या  यशोगाथेचे आणखी उदाहरण असे आहे की, 2022-23 साठी डीडी  फ्रीडिशच्या एमपीइजी -2 स्लॉट्सच्या वाटपासाठीच्या नव्या ई-लिलावामध्ये, 63 वाहिन्यांना  विविध प्रकारांमध्ये यशस्वीरित्या स्लॉट वाटप करण्यात आले.डीडी  फ्रीडिशच्या सदस्यता  आधारावरील वृद्धीसह , डीडी  फ्रीडिशवरील वाहिन्यांची  संख्यादेखील या वर्षी अनेक श्रेणींमध्ये  वाढली आहे.बातम्या आणि चालू घडामोडींच्या श्रेणीमध्ये वाहिन्यांची संख्या 11 वरून 14 पर्यंत वाढली आहे, तर हिंदी संगीत, हिंदी क्रीडा वाहिनी , हिंदी टेलिशॉपिंग , भोजपुरी चित्रपट आणि भोजपुरी सामान्य मनोरंजन वाहिन्यांच्या संख्येत  13 वरून 16 पर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे.Million Homes announces new channel line-up hadapsar news hadapsar latest news  हडपसर मराठी बातम्या

डीडी  फ्रीडिश सेवा एकूण 167 दूरचित्रवाणी वाहिन्या आणि 48 रेडिओ वाहिन्या उपलब्ध करून देते यात 91 दूरदर्शन वाहिन्या (51 को  ब्रँडेड शैक्षणिक वाहिन्यांचा समावेश आहे) आणि 76 खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांचा  समावेश आहे.1 एप्रिल 2022 पासून, डीडी फ्रीडिश खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या संचात  8 हिंदी सामान्य मनोरंजन वाहिन्या, 15 हिंदी चित्रपट वाहिन्या , 6 संगीत वाहिन्या, 22 वृत्त वाहिन्या, 9 भोजपुरी वाहिन्या, 4 भक्ती वाहिन्या आणि 2 परदेशी वाहिन्या असतील.

नवीन वाहिन्यांच्या समावेशामुळे डीडी फ्रीडिश संच पूर्वीपेक्षा अधिक वैविध्यपूर्ण आणि आकर्षक बनला आहे. डीडी फ्रीडिशवर प्रथमच खाद्यपदार्थांसाठी समर्पित वाहिनी , शेफ संजीव कपूर यांच्या  ‘फूड फूड’ चा समावेश करण्यात आला आहे. क्रीडाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता डीडी स्पोर्ट्स व्यतिरिक्त ‘माय कॅम ’ ही डीडी फ्रीडिशची  आणखी एक क्रीडा वाहिनी  असेल.

नवीन वाहिन्या प्राप्त करण्यासाठी डीडी  फ्रीडिश सेट-टॉप बॉक्स कसा सेट करायचा याबद्दल मार्गदर्शन करणारी  छोटी चित्रफीत पहा 

डीडी  फ्रीडिशवर नवीन वाहिन्या , 1 एप्रिल 2022 पासून उपलब्ध

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *