डेक्कन महाविद्यालयाचा परिसर देशाचा ऐतिहासिक अमूल्य ठेवा

Keep the campus of Deccan College a historical treasure of the country- Higher Education Minister Uday Samant

डेक्कन महाविद्यालयाचा परिसर देशाचा ऐतिहासिक अमूल्य ठेवा- उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत

पुणे : येरवडा येथील डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर व संशोधन संस्थेचा परिसर देशाचा ऐतिहासिक अमूल्य ठेवा असल्याचे प्रतिपादन उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.डेक्कन महाविद्यालयाचा परिसर देशाचा ऐतिहासिक अमूल्य ठेवा- उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत Keep the campus of Deccan College a historical treasure of the country- Higher Education Minister Uday Samant हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर व संशोधन संस्थेला श्री.सामंत यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कुलगुरु डॉ. प्रमोद पांडे, उपकुलगुरु डॉ. प्रसाद जोशी, शिक्षण संचालक धनराज माने, माजी कुलपती जी. बी. देगलूरकर आदी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, महाविद्यालयातील ऐतिहासिक दुर्मिळ ठेवा अमूल्य असून तो जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न करावे. या ऐतिहासिक ठेव्याचे डिजीटायझेशन करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा.

संगणकीय यंत्रणेसाठी शासनाच्यावतीने आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. परिसराचा विकास करण्यासाठी उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीमधून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावा. मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री यांच्याशी चर्चा करुन डेक्कन महाविद्यालयाचा परिसर शनिवार व रविवार या दोन दिवशी पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री. सामंत म्हणाले.

यावेळी श्री.सामंत यांनी पुरातत्व संग्रहालय, प्रोगैतिहासिक विधीका, मराठा संग्रहालय, जमखिंडी संस्थान संग्रह, संस्कृत आणि कोशशास्त्र विभाग, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर हे विद्यार्थी असताना वास्तव्य असलेल्या खोलीस भेट देवून पहाणी केली.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *