सरस प्रदर्शन दख्खन जत्राचे १७ ते २० फेब्रुवारीदरम्यान आयोजन

Pune Zilla Parishad पुणे जिल्हा परिषद हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Deccan Fair organized by Maharashtra State Rural Development Mission ‘Umed’

‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत सरस प्रदर्शन दख्खन जत्रा

विभागीय सरस प्रदर्शन दख्खन जत्राचे १७ ते २० फेब्रुवारीदरम्यान आयोजन

पुणे, सातारा, सांगली, सोलापुर व कोल्हापुर या पाच जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता समुहांचे विभागीय विक्री प्रदर्शनPune Zilla Parishad पुणे जिल्हा परिषद हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

पुणे : स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांची उन्नती व्हावी यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद पुणे मार्फत १७ ते २० फेब्रुवारी २०२३ दरम्यान ‘विभागीय सरस प्रदर्शन दख्खन जत्रा २०२३’चे पुणे कॅन्टामेंट बोर्ड गोळीबार मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद, पुणे कडून हे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्र शासनाची योजना असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियानांतर्गत (एनआरएलएम) महिला स्वयंसहाय्यता समुहांच्या आर्थिक उन्नतीसाठी या बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना व खाद्यपदार्थांना बाजारपेठ मिळण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विक्री प्रदर्शने आयोजित करण्यात येतात.

विभागीय स्तरावरील पुणे, सातारा, सांगली, सोलापुर व कोल्हापुर या पाच जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता समुहांचे विभागीय विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. यापूर्वीच्या विक्री प्रदर्शनात महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तु व खाद्यपदार्थांना चोखंदळ पुणेकरांची प्रचंड मागणी राहिली आहे.

या ‘विभागीय सरस प्रदर्शन दख्खन जत्रा २०२३’ विक्री प्रदर्शनात पुणे महसुली विभागातील जिल्हे व पुणे जिल्ह्यातील सर्व तालुके सहभागी आहेत. या प्रदर्शनामध्ये १५० स्टॉल उभारणीचे नियोजन असून काही वस्तुंचे व काही खाद्यपदार्थांचे समूह सहभागी होणार आहेत.

सदर प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या महिला सदस्यांची सांस्कृतिक स्पर्धा, वक्तृव स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, अभियानांतर्गत गटाचे महत्व, विविध रोजगाराच्या संधीचे महत्व आदी विषयांवरील चर्चा होणार आहेत.

या प्रदर्शनात पुणेकरांना ग्रामीण महिला कारागीर व स्वयंसहाय्यता समुहांतील वस्तुंची उत्पादने व अस्सल ग्रामीण चविष्ट, स्वादिष्ट, रुचकर खाद्यपदार्थांची खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहेत. होम मिनिस्टर, महाराष्ट्राची लोकधारा व विविध खेळ ही या प्रदर्शनाचे विशेष आर्कषणे आहेत.

पुणेकर नागरिक, सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी ग्रामीण महिला समुहांनी बनविलेल्या वस्तूंची खरेदी करून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी भरघोस प्रतीसाद देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *