आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू

Dedication of India’s first Best NCMC-Card facility

आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भारतातील पहिल्या बेस्टच्या एनसीएमसी-कार्ड सुविधेचे लोकार्पण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बेस्ट कर्मचाऱ्यांचे ग्रॅच्युईटीचे ४८३ कोटी रुपये क्लिकसरशी थेट खात्यात जमा

मुंबई : “..आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू. मुंबईत आम्ही सगळ्यांना अभिमान वाटेल, अशी कामं करत आहोत. प्रवास हा विकासाचाही असायला हवा. त्या दृष्टीने आज जागतिकCM- Udhhav Tahkrey Dy CM Ajit Pawar हडपसर मराठी बातम्या   Hadapsar Latest News, Hadapsar News. दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून, मुंबईने करून दाखवलं आहे. लोकांच्या आयुष्यातही ईझ ऑफ लिव्हिंग आणण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

मुंबई महानगरपालिकेचा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम – बेस्टच्या “नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड” – एनसीएमसीचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात ते बोलत होते.

बेस्टने एनसीएमसी-कार्ड सुविधेच्या माध्यमातून भारतातील कुठल्याही महानगरात नसेल अशी सुविधा उपलब्ध करून दिल्याची अभिमानास्पद कामगिरी केल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आज मी येथे बेस्टचं कौतुक करायला आलो आहे. आम्ही सगळ्यांना अभिमान वाटेल, अशी कामे करत आहोत. मी बेस्टच्या आयुष्याचाही प्रवास अनुभवला आहे. बेस्टचे अधिकारी, कर्मचारी नेहमीच पुढे चला.. पुढे चला म्हणूत अथकपणे लोकांच्या सेवेत असतात. कोरोनाच्या संकटातही एस.टी. आणि बेस्टने अलौकीक असे योगदान दिले आहे.

बेस्ट अनेक उपक्रमांत पहिल्या क्रमांकावर आहे. या उपक्रमासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही देऊन मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, बेस्टने अत्यंत माफक दरात उत्तम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेनेही शिक्षण, आरोग्यात उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. मुंबईतील महापालिकेच्या शाळेचा दर्जा हा आता अन्य शाळांत शिकणाऱ्या मुंलाच्या पालकांसाठीही आकर्षण ठरू लागले आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या शालेय जीवनातील बेस्ट बस प्रवासाच्या आठवणींनाही उजाळा दिला.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, देशाच्या आर्थिक राजधानीत सार्वजनिक परिवहन व्यवस्थेसाठी अशी महत्त्वपूर्ण आणि चांगली सुविधा सुरू होते आहे, याचा विशेष आनंद आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून मुंबई मिळवली आहे. या मुंबईचे मुंबईपण टीकवून, येथील मराठीपण जपत मुंबईकराच्या श्रमाला मोल मिळालं पाहिजे, त्यांच्या कष्टानंच फळ मिळाले पाहिजे या दृष्टीने विकास केला जात आहे. मुंबईने घोडागाडी ते मेट्रो पर्यंतचा प्रवास पाहिला आहे.

पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, पुढे चला हा मुंबईचा मंत्र आहे. हे पुढे चला देशभर नाही, तर जगभर घेऊन चालेल असा प्रयत्न आहे.  “नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड” – एनसीएमसी ही सुविधा उपलब्ध करून देणारा “बेस्ट” हा भारतातील पहिला सार्वजनिक परिवहन उपक्रम आहे. बेस्टने मुंबईकरांना अविरतपणे सेवा दिली आहे.

या सोहळ्यात बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीच्या ४८३ कोटी रुपयांच्या निधीचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते कळ दाबून डिजिटली वितरण करण्यात आले. बेस्टचे महाव्यवस्थापक श्री. चंद्रा यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते एनसीएमसी कार्डचे अनावरणाद्वारे लोकार्पण करण्यात आले. बेस्टच्या व्हिजन डॉक्युमेंटचेही प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यास महापालिका, बेस्ट उपक्रमाचे अधिकारी, कर्माचाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हडपसर न्युज ब्युरो.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *