Dedication of Metro 2A and Metro 7 by the Chief Minister
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो २ अ तसंच मेट्रो ७ या दोन मार्गांचं लोकार्पण
मुंबई : मुंबईत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो २ अ तसंच मेट्रो ७ या दोन मार्गांचं लोकार्पण केलं. पर्यावरणाचा समतोल राखून मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडी शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
त्याचबरोबर मेट्रोचे खरे श्रेय मुंबईकरांच्या कष्टाला आहे, त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी यापुढेही कार्यरत राहणार, असेही श्री.ठाकरे यांनी आवर्जून सांगितले
२ अ मेट्रो मार्ग दहिसर ते डहाणूकरवाडी असा असून त्यात सात स्थानकं आहेत. मेट्रो ७ हा मार्ग दहिसर पूर्व ते आरे मिल्क कॉलनी असून त्यात १० स्थानकं आहेत. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत या मेट्रोगाड्या धावणार आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरचा ताण बराच कमी होईल.
मेट्रोचं तिकीट १० ते ५० रूपये आहे. दिवसातून या मार्गावर दीडशे फेऱ्या होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह इतर मान्यवरांबरोबर मेट्रोतून प्रवास केला.
राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटाक्षाने लक्ष देत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. येत्या तीनं वर्षात यासाठी चार लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
Hadapsar News Bureau