भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांना जगभरातून मागणी वाढत असून, भारताची पुरवठा साखळी व्यवस्था मजबूत होत चालली अहे – प्रधानमंत्री

Demand for Indian-made products is growing worldwide, and India’s supply chain is getting stronger – PM

भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांना जगभरातून मागणी वाढत असून, भारताची पुरवठा साखळी व्यवस्था मजबूत होत चालली अहे – प्रधानमंत्री

नवी दिल्ली : भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांना जगभरातून मागणी वाढते आहे, तसंच भारताची पुरवठा साखळी व्यवस्था मजबूत होत चालली असल्याचं दिसतं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

Prime Minister Narendra Modi
File Photo

प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणी वरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा ८७वाभाग होता. देशानं मागच्याच आठवड्यात ३० लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचं लक्ष्य साध्यकेल्याची माहिती त्यांनी दिली.

ही बाब अर्थव्यवस्थेपेक्षाही भारताचं सामर्थ्य आणि क्षमतेशी संबंधित आहे असं ते म्हणाले. जेव्हा देशाच्या स्वप्नांपेक्षाही देशाचे संकल्प मोठेअसतात, तेव्हाच देश विराट पावलं उचलू शकतो, असं त्यांनी सांगितलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी उस्मानाबादच्या हातमाग उत्पादनांसह, नवी उत्पादनं प्रयत्नपूर्वक नव्या देशात निर्यात केली जात असल्याची उदाहरणही मांडली.

लोकलला ग्लोबल बनवून आपल्या उत्पादनांची प्रतिष्ठा वाढवायचं आवाहनत्यांनी केलं.देशांतर्गत पातळीवर गव्हर्नमेंट ई मार्केट अर्थात ई जेम च्या माध्यमातून लघु उत्पादकांना त्यांची उत्पादनं सरकारला विकण्याचीमिळवून दिलेली संधी आणि त्याअंतर्गत झालेल्या खरेदी विषयीची माहिती त्यांनी दिली.

हे नव्या भारताचं उदाहरण आहे, आणि नवा भारत केवळ मोठी स्वप्नंच बघत नाही,तर ते लक्ष्य गाठण्याची हिंमतही दाखवतो, याच साहसाच्या जोरावर आपण आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्तकेला.

जगभराचा आयुर्वेदाकडे वाढलेला ओढा तसंच आर्युवेदाशी संबधित आयुष उद्योग क्षेत्रात वाढलेली संधी आणि वाढते स्टार्टअप याबद्दलची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री आरोग्याचा आणि स्वच्छेतेच्या परस्पर संबंधांविषयी बोलतांना त्यांनी महाराष्ट्रातल्या नाशिक इथले स्वच्छता विषयक कार्यकर्ते चंद्रकिशोर पाटील यांच्या कार्याचा उल्लेख केला.

त्याविषयी चंद्रकिशोर पाटील यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. चंद्रकिशोर पाटील सगळ्यांच्याच निरोगी आरोग्यासाठी नागरिक म्हणून आपण स्वच्छता, पोषण, लसीकरण, अशा सगळ्याच बाबतीत आपलं कर्तव्य पार पाडायला हवं,असं आवाहन त्यांनी केलं.

जल बचतीच्या महत्वाविषयी बोलतांना दिलेल्या उदाहरणात त्यांनी बारव अर्थात पायऱ्यांच्या विहिरींच्या जतन संवर्धनासाठी महाराष्ट्रातल्या रोहन काळे या तरुण कार्यकर्त्याच्या प्रयत्नांचा उल्लेख केला. याविषयी रोहन काळे यांनी आकाशवाणीवर आपल्या भावना अशा व्यक्त केल्या.

रोहन काळेजल बचतीसाठी जनतेनं वैयक्तिक तसंच संयुक्तपणे शक्य ते प्रयत्न करावेत, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात, देशभरात प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी ७५ अमृत सरोवर बनवता येवू शकतील,असं ते म्हणाले.

येत्या ११ एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले, तर १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याचा उल्लेख करून, त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रिबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचं स्मरण केलं.

या तीनही व्यक्तीमत्वांच्या कार्यातून शिकण्यासाठी,त्यांच्याशी संबंथित स्थानांना भेटी द्यायचं आवाहन त्यांनी जनतेला केलं. आपले सण आणि परंपरा एकाचवेळी उत्सवी स्वरुप आणि संयमाची शिकवण देत असल्याचं सांगून, त्यांनी आगामी सण सर्वांनाबरोबर घेऊन साजरे करत भारताच्या विविधतेला सशक्त बनवायचं आवाहन केलं.

Hadapsar News Bureau

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *