“भारत आणि तैवान यांच्यातील लोकशाही शासनाची तुलना” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद

Savitribai Phule Pune University ready for G-20 guests..!! जी-२० मधील पाहुण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सज्ज..!! हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

One Day International Conference on “Comparison of Democratic Governance between India and Taiwan”.

“भारत आणि तैवान यांच्यातील लोकशाही शासनाची तुलना” या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि फ्लेम विद्यापीठाचा संयुक्त कार्यक्रमSavitribai Phule Pune University

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र, स्ट्रेटेजिक कल्चर सिक्युरिटी फाऊंडेशन, फ्लेम विद्यापीठाचे सेंटर फॉर साऊथ ईस्ट एशिया स्टडीज आणि सेंटर फॉर साऊथ ईस्ट एशियन स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारत आणि तैवान यांच्यातील लोकशाही शासनाची तुलना’ या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथील वायसी-निसदा सभागृह येथे होणार आहे.

या परिषदेसाठी राष्ट्रीय आंतररष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ व्यक्ती आपले विचार मांडणार आहेत अशी माहिती संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ.विजय खरे यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे, प्रभारी कुलगुरू प्रा. (डॉ.) कारभारी काळे आणि व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र शिंगणापूरकर उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

ही एक दिवसीय परिषद गुरुवार, ४ मे २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून वायसी-निसदा सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे होईल. ही आंतरराष्ट्रीय परिषद ऑफलाइन पद्धतीने आयोजित केली जाईल. या परिषदेत सहभागी होऊ इच्छित व्यक्तींना पूर्व नोंदणी आवश्यक आहे.

पहिल्या सत्रात पर्यावरण प्रशासन आणि आपत्ती तयारी: तैवान आणि भारत तुलना, बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) शासनाच्या गतीशीलतेसाठी एक घटक: आग्नेय आशियातील अनुभव, ई-गव्हर्नमेंट/ट्रेड/इन्व्हेस्टमेंट आणि डेम गव्हर्नन्सचा समावेश केला जाईल.

यावेळी आणीबाणीच्या काळातील सार्वजनिक आरोग्याची व्यवस्था व प्रशासन आणि परराष्ट्र धोरण भारत आणि तैवानच्या संदर्भात चर्चा होणार असून यावेळी सेंटर फॉर चायना ॲनलिसिस अँड स्ट्रॅटेजीचे अध्यक्ष जयदेव रानडे आणि तैवान येथील प्रतिष्ठित प्राध्यापक आणि तैवान-एशिया एक्सचेंज फाउंडेशन (TAEF) चे संचालक डॉ. ॲलन हाओ यांग, राज्यशास्त्र विभाग, तुंघाई विद्यापीठ येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. येन-युंग-मिन, इन्स्टिट्यूट ऑफ चायना आणि एशिया-पॅसिफिक स्टडीज, नॅशनल सन यत-सेन विद्यापीठ येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. चांग चिया-चियन, ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स, तैवान येथील प्रा. डॉ. वेन टॅन; संरक्षण आणि सामरिक अभ्यास विभागाचे माजी प्रमुख प्रा. (डॉ.) श्रीकांत परांजपे हे आपले विचार मांडणार आहेत.

तर परिसंवादाच्या दुसऱ्या सत्रात सार्वजनिक आरोग्य आणि शासन आणि परराष्ट्र धोरण यासारख्या विषयांवर सेंटर फॉर चायना ॲनालिसिस अँड स्ट्रॅटेजी (CCAS), नवी दिल्लीच्या रिसर्च फेलो, सुश्री नम्रता हसिजा, इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल सायन्स, नॅशनल सन यात-सेन विद्यापीठ येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. लॅन त्सुंग-येन चेन; सावरकर चेअर प्रोफेसर एअर मार्शल भूषण गोखले पीव्हीएसएम एव्हीएसएम व्हीएम (निवृत्त); तैवान-एशिया एक्सचेंज फाउंडेशन (TAEF) चे संचालक डॉ. ॲलन हाओ यांग आदी वक्ते आपली मते मांडतील.

मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जन सिंग अध्यासनाचे एअर मार्शल एस.एस.सोमण; जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथील प्राध्यापक डॉ. अरविंद कुमार, संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ.विजय खरे; छत्रपती शिवाजी महाराज चेअर इन पॉलिसी स्टडीज चेअरचे प्रोफेसर, लेफ्टनंट जनरल एस.एस. हसबनीस हे सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील तर मुंबई विद्यापीठाचे प्रा.मृदुल निळे आणि प्रा. लियाकत खान तसेच संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातील मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अध्यासनाचे चेअर प्रोफेसर डॉ. शेषाद्री चारी हे या सत्रांना चर्चक म्हणून सहभागी होतील.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *