Denial of news that schools with enrollment of less than 20 students will be closed
२० विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याच्या बातम्यांचं खंडन
मुंबई : २० विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याच्या बातम्यांचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून खंडन केलं आहे.
२० विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याच्या बातम्या निराधार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.
अशा शाळांबाबत केंद्राकडून विचारणा झाल्यामुळे त्यांची माहिती घेण्याचं काम सुरु केलं. मात्र या शाळा बंद करण्याबाबत कसलाही निर्णय झालेला नाही, असं ते म्हणाले.
या शाळांमधल्या शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसचं याबाबत दिशाभूल करणारी, चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा केसरकर यांनी दिला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com