Opposition Leader Devendra Fadnavis Accuses OBCs of Imperial Data Collection
ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सदोष पद्धतीनं सुरू असल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
मुंबई : मागासवर्ग आयोगाकडून ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं(Imperial Data Collection) सुरू असलेलं काम सदोष आहे. यात आडनावावरुन लोकांची जात ठरवण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
एकाच आडनावाची माणसं वेगवगेळ्या समाजातून आलेली असतात. त्यामुळे महाविकास आघाडीने योग्य पद्धतीने सर्व्हेक्षण करावे. या पद्धतीच्या सर्व्हेमुळे ओबीसी संख्या मोठ्या प्रमाणात घटू शकेल. त्यामुळे त्याचा आरक्षणावर परिणाम होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या चुकीच्या पद्धतीने डेटा गोळा करून जर तो न्यायालयात मांडला आणि न्यायालयाने तो डेटा मान्य केला तर ओबीसी समाजाचं अतोनात नुकसान होऊ शकतं. न्यायालयात हा डेटा गेल्यानंतर त्यांना पुन्हा युटर्न मिळणार नाही.
या सर्व्हेक्षणाकडे मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालावे अन्यथा, भाजपला मैदानात उतरावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला. (State government failing to collect empirical data, says Devendra Fadnavis)
यामुळं प्रत्यक्ष संख्येपेक्षा कमी नागरिक ओबीसी असल्याचं समोर येत आहे. राज्य सरकारनं याप्रकाराची योग्य दखल घेतली नाही तर आंदोलन करु असं ते म्हणाले.
बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या आरोपात तथ्य असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव यांना माहिती दिली आहे.
आयोगाच्या अध्यक्षांशीही चर्चा केली असल्याचं ते म्हणाले. डेटा गोळा करण्याच्या पद्धतीत बदल करुन ओबीसींवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊ असं ते म्हणाले. याप्रकरणी १२ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे.
हडपसर न्युज ब्युरो