Record Digital Disbursement to Defence Pensioners via SPARSH
संरक्षण क्षेत्रातल्या निवृतीवेतनधारकांना ‘स्पर्श’च्या माध्यमातून विक्रमी वितरण
5.6 लाख निवृत्तीवेतनधारकांनी स्वीकारले डिजिटल माध्यम
नवी दिल्ली : डिजिटल उपक्रमाला चालना देण्यात येत आहे. यामध्ये सेवानिवृत्तीवेतन प्रशासन प्रणाली- रक्षा अथवा स्पर्श यांनी ऑगस्ट 2022 मध्ये संरक्षण क्षेत्रातल्या निवृत्तीवेतन धारकांना 3,090 कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम डिजिटल पद्धतीने वितरित केली आहे.
आणखी एक लक्षणीय गोष्ट म्हणजे ऑगस्ट 2022 मध्ये 5,62,946 संरक्षण निवृत्तीवेतन धारकांनी डिजिटल माध्यमांद्वारे निवृत्तीवेतन स्वीकारण्याचा पर्याय निवडला आहे.
‘स्पर्श’ मध्ये सहभागी झालेल्या एकूण निवृत्तीवेतन धारकांच्या संख्येने आता 10 लाखांचा टप्पा पार केला असून ,या लाभार्थींची संख्या 11 लाख झाली आहे. भारतामध्ये असलेल्या संरक्षण क्षेत्रातल्या एकूण निवृत्तीवेतन धारकांपैकी जवळपास 33 टक्के निवृत्तीवेतन धारक डिजिटल माध्यमाशी जोडले गेले आहेत.
डिजिटल इंडिया अभियानामध्ये राबविण्यात येत असलेल्या नवकल्पनांमुळेच, हे बदल घडून आले आहेत. स्पर्श ही वेब-आधारित प्रणाली आहे. त्याद्वारे सेवानिवृत्तीवेतन धारकाच्या थेट बॅंक खात्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थाशिवाय निवृत्तीवेतन जमा केले जाते.
आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये फक्त 57 कोटी रूपये डिजिटल माध्यमातून जमा झाले होते. त्या तुलनेत 2021-22 मध्ये 11,600 कोटी रूपये निवृत्तीवेतन धारकांच्या बॅंक खात्यांमध्ये डिजिटल माध्यमातून जमा झाले आहेत.
संरक्षण खात्यातल्या निवृत्तीवेतन धारकांच्या थेट बॅंक खात्यामध्ये निवृत्तीवेतन जमा करण्याच्या कामाची अंमलबजावणी नोडल संस्था- संरक्षण लेखा विभागामार्फत ‘स्पर्श’ प्रकल्पातून केली जात आहे. 3000 हून अधिक निवृत्तीवेतन सुरू करणे, मंजुरी देणे आणि वितरण करणे, ही कामे एकत्रित केली जातात.
निवृत्तीवेतन धारकांच्या पडताळणीची डिजिटल प्रक्रिया पूर्ण करणे तसेच तक्रार निवारणाची ‘रिअल टाइम ट्रॅकिंग’ यंत्रणेपर्यंतची सर्व कामे केली जातात. आता ज्येष्ठ संरक्षण कर्मचा-यांना निवृत्तीवेतनाची सेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्यात आली आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com