By the year 2024-25, about 10 thousand km of digital highways will be created
वर्ष 2024-25 पर्यंत सुमारे 10 हजार किमीचे डिजिटल महामार्ग तयार करणार
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वर्ष 2024-25 पर्यंत सुमारे 10 हजार किमीचे डिजिटल महामार्ग तयार करणार
डिजिटल महामार्ग निर्मितीमुळे देशाची प्रगती आणि विकासावर तर आमूलाग्र आणि सकारात्मक परिणाम
नवी दिल्ली : एनएचएआय म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण देशभरात वर्ष 2024-25 पर्यंत 10 हजार किमी चे ऑप्टिक फायबर केबल्सच्या पायाभूत सुविधा उभारण्यावर काम करत आहे.
राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक्स व्यवस्थापन लिमिटेड – एन एच एल एम एल ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची स्पेशल पर्पज व्हेईकल संस्था असून या संस्थेद्वारे डिजिटल महामार्गांचे जाळे विकसित करण्यासाठी एकात्मिक उपयुक्तता कॉरिडॉर तयार केले जात आहेत.
दिल्ली – मुंबई द्रुतगती मार्गावर 13,67 किमी आणि हैदराबाद – बंगळुरू मर्गिके वरील 512 किमी मार्गांची डिजिटल महामार्ग विकसित करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
देशभरात दुर्गम भागात आणि टोकावरच्या गावांपर्यंत इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी ऑप्टिक फायबर केबल्सचे जाळे जलद गतीने विकसित करण्यासाठी मदत होणार असून त्याद्वारे 5- जी, 6- जी हे अत्याधुनिक नेटवर्क तंत्रज्ञान सुरू करता येईल.
अलीकडेच उद्घाटन झालेल्या 246 किमी लांबीच्या दिल्ली दौसा लालसोट या दिल्ली मुंबई द्रुतगती महामर्गाच्या पट्ट्यावर तीन मीटर रुंदीचा समर्पित ऑप्टिकल फायबर केबल्स घातल्या गेल्या आहेत. यामुळे या पट्ट्यातील सर्व प्रदेशात इंटरनेट सेवा दिल्या जातील. राष्ट्रीय महामार्गावर ह्या केबल्स टाकण्याचे काम सुरू झाले असून येत्या वर्षभरात ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
ओ एफसी च्या जाळ्यामुळे दूरसंचार /इंटरनेट सेवा प्रदात्याना फायबर ऑन डिमांड किंवा थेट प्लग अँड प्ले मॉडेल्स देता येतील. हे नेटवर्क एका निश्चित दराने भाडे पट्टीवर दिले जाईल आणि ते वेब पोर्टलमार्गे पात्र वापरकर्ता असलेल्या सर्वांसाठी खुले असेल. दूरसंचार विभाग आणि ट्राय शी सल्ला मसलत करुन ओ एफ सी वितरणाचे अंतिम धोरण निश्चित केले जाईल.
डिजिटल महामार्ग निर्मितीमुळे देशाची प्रगती आणि विकासावर तर आमूलाग्र आणि सकारात्मक परिणाम होईलच शिवाय देशाच्या डिजिटल परिवर्तन प्रक्रियेतही मदत होईल.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com